नवी मुंबईतील घणसोली नोडमध्ये अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई करीत चार शेड जमीनदोस्त केल्या. या ठिकाणी नियोजित रस्ता उभारण्याचे काम सुरु करण्यात येत आहे. अतिक्रमण विभागाच्या या कारवाईमुळे रस्ता उभारणीसाठी मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा- नवी मुंबईतही रविवारपासून रिक्षा प्रवास महागणार

घणसोलीतील गोठीवली कमान ते सेक्टर २३ कडे जाण्यासाठी नवीन मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी जागाही उपलब्ध आहे. मात्र, या जागेत अतिक्रमण करण्यात आले होते. मोठाली शेड बांधून व्यवसाय केला जात होता. अनेक वर्षापासून हे सुरु होते. त्यामुळे कारवाई करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू शकतो, म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हि तैनात करण्यात आला होता. सकाळी ११ च्या सुमारास सदर कारवाई सुरु झाली होती हि कारवाई संध्याकाळ पर्यत पूर्ण होईल  अशी माहिती विभाग कार्यालयाकडून देण्यात आली.

हेही वाचा- लवकरच नवी मुंबईकरांना मिळणार डबल डेकरची सफर ! एनएमटीच्या ताफ्यात १० विद्युत डबल डेकर बस दाखल

या कारवाईने नियोजित रस्त्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. पावसाला जवळपास संपलाच असल्याने लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरु होईल या नवीन रस्त्याने गोठीवली कमान परिसरात वारंवार होणार्या वाहतूक कोंडीतून सुटका होईल . अशी माहिती विभाग कार्यालयाकडून देण्यात आली.    

Story img Loader