लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उरण : राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने यांत्रिकी नौकांवर पावसाळी मासेमारीसाठी बंदी घातली असताना ही ती झुगारून मासेमारी करणाऱ्या २२ नौकांवर विभागाने कारवाई केली आहे.
१ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यासाठी किनाऱ्यावर आणि खोल समुद्रात यांत्रिकी नौकांनी मासेमारी करण्यावर राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने बंदी घातली आहे. त्यामुळे उरणच्या करंजा व मोरा सह इतर बंदरावर शेकडो मासेमारी बोटी किनाऱ्यावर विसावल्या आहेत.तसेच बोटीचे पावसा पासून संरक्षण करण्यासाठीच्या उपाययोजना सुरू झाल्या आहेत. यामध्ये मासेमारी जाळी ही सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. ही बंदी मत्स्यबीज उत्पादन आणि मासळीच्या प्रजननासाठी लागणार कालावधी हा पावसाळ्यात सुरू होतो त्याकरिता लावण्यात येते. जून व जुलै या दोन महिन्यात विविध प्रकारचे मासे अंडी घालतात. त्यांनतर त्यांची पैदास होण्यास सुरुवात होते. या कालावधीत मासळीचे व मत्स्यबीज यांचे संरक्षण व्हावे यासाठी ही बंदी घातली जाते.
आणखी वाचा-नवी मुंबई: जय श्रीराम घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेने काढले, मनसे विद्यार्थी सेनेचे आंदोलन
स्थानिक व किनारपट्टीवरील मासेमारांना काही नियमांचे पालन करीत मासेमारी करता येते. मात्र मत्स्यव्यवसाय विभागाने घातलेली बंदी व त्याचे नियम भंग केल्यास विभागाकडून कारवाई करण्यात येते. ही बंदी लागू असतानाही मासेमारी नौका समुद्रात उतरविण्यात आल्याने स्थानिक मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता पर्यंत २२ नौकांवर कारवाई केली असून त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहीती रायगड जिल्हा सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त संजय पाटील यांनी दिली आहे. या कारवाईत नौकेचा परवाना, दिल्या जाणाऱ्या सवलती रद्द करणे, तसेच नौका जप्त करण्याच्या तरतुदी असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.