मागील आठवड्यात कासाडी नदीत हानिकारक रासायनिक द्रव्य सोडताना ऐका टँकरला रंगेहाथ पकडण्यात आले होते. तसेच रसायन असणाऱ्या कंपनीकडे खुलासा मागविण्यात आला होता. त्यानुसार खुलास्यामध्ये कंपनीने चूक मान्य केली होती. त्यामुळे प्रदूषण करण्यावर लगाम ठेवण्यासाठी रायगड महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने महाड येथील हार्ट्ज ऑरगॅनिक या कंपनीवर बंदची कारवाई केलेली आहे.
हेही वाचा >>> सानपाडा रेल्वे स्टेशन बाहेर त्याने स्वतःला पेटवून घेतले
कासाडी नदी गेल्या कत्येक वर्षांपासून प्रदूषणाला बळी पडत आहे. त्यामुळे नदी पात्रातील पाण्याचे वेगवेगळे रंग देखील पहावयास मिळत आहेत. रायगड महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने प्राप्त तक्रारी नुसार सापळा रचून नदीत हानिकारक सल्फयुरिक ऍसिड सोडताना टँकरला रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानुसार महाड येथील हार्ट्ज ऑरगॅनिककंपनीकडे खुलासा मागविण्यात आला होता. दरम्यान खुलशा मध्ये कंपनीने नदीत पात्रात हानिकारक रासायनिक द्रव्य सोडल्याचे मान्य करत पुन्हा अशी चूक करणार नसल्याची ग्वाही दिली. परंतु पर्यावरणाचे आशा प्रकारे प्रदूषण करणाऱ्यांवर वचक बसला पाहिजे आणि कंपनीने केलेले कृत्य पर्यावरणाला हानी पोचवत होते. त्यामुळे या कंपनीवर कारवाई करून कंपनी बंद करण्यात आली आहे . दि.२१ रोजी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने ही कारवाई केली आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबईत स्वच्छतेबाबतची मरगळ संपता संपेना…; निर्माल्य कलश भरले; उचलणार कधी ?
कलम ३३अ अन्वये पाणी (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा, १९७४ आणि हवा (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम, १९८१ च्या कलम ३१अ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून ७२ तासांच्या आत त्यांचे उत्पादन बंद करण्यात आले. तसेच ७२ तासांनंतर कंपनीचे पाणी आणि वीज जोडणी ही बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती रायगड महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उप- प्रादेशिक अधिकारी विद्यासागर किल्लेदार यांनी दिली आहे.