लोकसत्ता टीम

पनवेल : सिडको महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा भार विजय सिंघल यांनी घेतल्यावर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प आणि उलवे परिसरात राडारोडा टाकणाऱ्यांविरोधातील जोरदार मोहीम सिडकोच्या दक्षता विभागाने पुन्हा सुरु केली आहे. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता बेलापूर येथील पेट्रोल पंपाशेजारी मुंबईहून आणलेला राडारोडा उलवे परिसरात टाकण्यासाठी चाललेल्या पाच डंपर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. पोलीसांकडे यापूर्वीही सिडकोच्या अधिकाऱ्यांनी नवी मुंबईत संबंधठिकाणी राडारोडा टाकणाऱ्यांना रात्रपाळी करुन पकडून दिले आहेत. मात्र आजपर्यंत नवी मुंबई पोलीस याबाबत गंभीर भूमिका घेऊन या टोळीचा पर्दाफास करु शकले नाहीत. 

Shop fire Nashik, hospital safe Nashik, fire Nashik,
नाशिकमध्ये दुकानाला आग, वरच्या मजल्यावरील रुग्णालय सुरक्षित
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
st bus maharashtra, buses, ST, ST corporation,
आनंदवार्ता… ‘एसटी’च्या ताफ्यात आणखी २,५०० बसगाड्या येणार
no decision has been taken on mechanism to fill pothole in City Post premises after 24 hours
‘खड्ड्यांत’ गेलेल्या पुण्यात खड्डा बुजविण्यावरून ‘खड्डाखड्डी’!
Vasai, Crime Branch-2, dead body, Vasai crime news,
वसई : गुन्हे शाखा-२ च्या पथकाची जलद कामगिरी, महामार्गावर आढळलेल्या मृतदेहाच्या हत्ये प्रकरणात तृतीयपंथीय ताब्यात
truck out of hole pune, paver block collapse pune,
पुणे : चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ट्रक आणि दुचाकी खड्ड्याबाहेर, पेव्हर ब्लॉक खचल्याने घडली घटना
Mumbai, Worker died, Worker hit by car,
मुंबई : हिरे व्यापाऱ्याच्या गाडीच्या धडकेत कामगाराचा मृत्यू, सागरी किनारा रस्त्यावरील घटना
vandalized vehicles Pimpri Chinchwad, Pimpri-Chinchwad latest news,
पिंपरी-चिंचवड: १४ वाहनांची तोडफोड करणाऱ्या ‘त्या’ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

सिडकोच्या दक्षता विभागाने काही महिन्यांपूर्वी  सिडकोने संपादित केलेल्या सर्व जमिन क्षेत्रात राडारोडा टाकणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली होती. दक्षता विभागाच्या अंतर्गत अभियंता विभाग, सुरक्षा विभाग यांचे संयुक्त पथक यासाठी रात्रभर जागून ही कारवाई करत होते. यामुळे पर्यावरणाचे रक्षण काहीअंशी केले जात होते. मात्र दक्षता विभागाने काही दिवस सातत्याने कारवाई सुरु केल्यानंतर अचानक ही कारवाई बंद करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा खाडी व पाणथळक्षेत्रात राडोराड्याचा भराव करुन भूखंड निर्माण करण्याचे प्रकार वाढले होते. पर्यावरणवाद्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी याबाबतच्या सूचना दिल्यावर मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता बेलापूर येथील अपोलो रुग्णालयाशेजारी राडारोड्याने भरलेले पाच डंपर संशयीतरित्या उभे असल्याचे आढळले.

आणखी वाचा- नवी मुंबई : मित्रांसोबत मद्य घेतले आणि मित्रानेच घरात चोरी केली 

एमएच ४७ वाय ९८३७ वरील चालक कमलेश जगदिश चौहान (रा. तुर्भे, नवी मुंबई) एमएच ४३ बीपी १९३३ वरील चालक मोहमंद मँफुज (तुर्भे नाका, नवी मुंबई) एमएच ४६ ३६०४ चालक गौतम लक्ष्मण महतो (साईनगर वहाळ, पनवेल) एमएच ०४ एलई ३९६९ चालक नाजिर खान ( शिवाजीनगर गोवंडी, मुंबई)  एमएच ०३ डीव्ही ६४०० चालक विकास कुंडलीक कुटे (मानखुर्द, मुंबई) यांना ताब्यात घेऊन संबंधित चालकां विरोधात बेलापूर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. २६९, ५११, ३४ प्रमाणे गुन्हा नोदविण्यात आला. सिडकोच्या जनसंपर्क विभागाने राडारोडा टाकणाऱ्यांविरोधात http://www.cidco.maharashrta.gov.in या संकेतस्थळावर माहिती देण्याचे आवाहन केले आहे.