नवी मुंबई : अंमली पदार्थ विरोधी पथकाने सीबीडी गांजा विकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली असून, त्याच्याकडून ७० हजार ४०० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. विशाल लक्ष्मण घोडे (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सीबीडी बेलापूर येथील टाटानगर झोपडपट्टीत राहतो. 

मंगळवारी आरोपीबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस. सय्यद यांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर टाटानगर झोपडपट्टीत छापा टाकला असता आरेापी विशाल लक्ष्मण याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती व झोपडीत शोधाशोध केली असता त्याच्याकडे ३ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ किंमत एकूण ७०४०० रुपये मिळून आला.

हेही वाचा – पुणे : दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई; नाशिक कारागृहात स्थानबद्ध

हेही वाचा – खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक, दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात करण्यात आलं दाखल

आरोपीविरुद्ध सीबीडी पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस. सय्यद यांनी दिली.

Story img Loader