लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उरण: सिडकोने उभारलेल्या वायू विद्युत केंद्र प्रकल्पा नजीकच्या रेल्वे उड्डाणपूलावरील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून भरदिवसा ही सुरूच असल्याचे चित्र आहे. रविवारी ही हे पथदिवे दुपारी १२ वाजता सुरुच होते.

एकीकडे सिडकोच्या अखत्यारीत मोडणाऱ्या उरण मधील नवघर व बोकडवीरा उड्डाणपूलावर महिनोमहिने अंधार पसरला आहे. यामुळे या उड्डाणपूला वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अंधारातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. मात्र वायू विद्युत केंद्र प्रकल्पाला जोडणाऱ्या उड्डाणपूलावर पथदिव्याचा लखलखाट पसरला आहे.

आणखी वाचा-आज हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक

सिडकोच्या विद्युत विभागाचे उरण मधील उड्डाणपूल व मार्गावरील पथदिव्याकडे सातत्याने दुर्लक्ष सुरु असून कुठे दिवसाढवळ्या प्रकाश तर बहुतांशी ठिकाणी रात्रीचा अंधार आशा परिस्थिती असल्याने उरणच्या नागरिकांकडून सिडकोच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.