नवी मुंबई : संत गाडगेबाबा अभियानात पहिले तीन वर्ष सलग महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाचे शहर व देशात तिसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबई शहराला व महापालिकेला स्वच्छतेते नावलौकीक मिळवून स्वच्छ सर्वेक्षणामध्ये राज्यात नेहमीच प्रथम तर देशात सतत मानांकन उंचावणारे शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकीक प्राप्त झाला आहे. पालिकेच्या या नावलौकीकात स्वच्छता कर्माचाऱ्यांचे य़ोगदान मोलाचे असून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पालिकेच्यावतीने शहरातील प्रत्येक विभागातील २ अशा ८ पुरुष सफाई कर्मचारी व ८ स्त्री सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले,संजय काकडे, तत्कालीन उपायुक्त बाबासाहेब राजळे यांच्यासह विविध अधिकाऱ्यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान कृतज्ञतापूर्वक करण्यात आला.
यावेळी ‘स्वच्छता अभियान२०२३’ ची सुरुवात झाल्याची घोषणा करण्यात आली. ‘सर्व मिळून अधिक जोमाने काम करूया आणि आपले मानांकन उंचवूया’ यासाठी २०२३च्या स्वच्छता अभियानात ‘निश्चय केला नंबर पहिला’ असा निर्धार व्यक्त करत स्वच्छता कर्मचारी हे शहराचे स्वच्छतेतील शान असल्याची भावना मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आल्या.नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्यावतीने स्वच्छता विषयक उल्लेखनीय कामगिरी करून नवी मुंबई महानगरपालिकेस स्वच्छता अभियानात पुरस्कार मिळवून देणा-या गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये उरण नगरपरिषदेचा राज्यात ४२ वा क्रमांक
सफाई कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
रस्त्यावर उतरुन प्रत्यक्षात शहराची स्वच्छता करणारे सफाई कर्मचारी हेच स्वच्छतेचे व शहराची शान आहेत.त्यामुळे त्यांचा सन्मान म्हणजे त्यांच्या शहराविषयी असलेल्या आपलेपाणाचा व कर्तव्यनिष्ठतेचा सन्मान आहे. त्यांच्यामुळे व सर्वांच्या सहकार्याने देशात शहराची मान अभिमानाने उंचावली आहे. शहराचा प्रत्येक नागरीक व सफाई कर्माचारी या यशाचा खरा शिलेदार आहेत. -सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका
‘आमचं शहर स्वच्छ शहर’ या भावनेतून आम्ही सफाई कामगार सतत प्रयत्न करतो. देशात शहराचा गौरव केला जातो तेव्हा आम्हालाही सफाई कामगार म्हणून आमच्या शहराचा अभिमान वाटतो सर्व सर्व महिला व पुरुष सफाई कामगार व त्यांना पाठवा देणारे सर्व अधिकारी व नागरी यांचा हा सन्मान आहे.- जयप्रकाश तांडेल,सफाई कामगार.