उरण : साम,दाम,दंड भेद झिडकारून कार्यकर्त्यांनी काम केले आहे. संविधान आणि लोकशाहीला भाजपा कडून धोका कायम असल्याचे मत मंगळवारी उरणच्या जेएनपीटी येथील मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. हा मेळावा कार्यकर्त्यांच कौतुक,आभार,अभिनंदन आणि निर्धार व्यक्त करण्यासाठी मेळावा महाराष्ट्राने हुकुमशहाला लोकशाही काय असते ते निवडणूकीत दाखवून दिले.
संविधान बदलण्याचा धोका कायम आहे. भाजपच्या मनात होत. भाजपचं संविधान आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. साम धाम दंड भेद झुगारून,केंद्र सरकार गडगडणार महाविकास आघाडी चे सरकार सत्तेत येणार आहे. कार्यकर्त्यांनी नेटाने काम केले. पक्ष चोरून ही नऊ खासदार निवडून आणले आहेत. सोडून गेलेल्याने दरवाजे खिडक्या नाही भोक ही बंद केले आहेत. परत घेणार नाही. सरकार स्थानिक स्वराज्य संस्था आणि छोट्या निवडणूक घेण्यास घाबरत आहेत. अनेक ठिकाणी नवीन नावे देण्यात येत आहेत मात्र दिबांच नवा नवी मुंबई विमानतळाला का दिल नाही ते देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. महाराष्ट्रातील सरकार मालक आणि कंत्राटदार यांच्यासाठी काम करीत असून जनतेसाठी एकही काम केले नाही. विश्वासघात हा महाराष्ट्रा सोबत झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बदलणारे कामगार कायदे,महाराष्ट्रात वाढणारी बेरोजगारी ही स्थिती बदलण्याचा निर्धार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांकडून जखमी वारकऱ्यांची विचारपूस
या मेळाव्यात लोकसभेला उरण विधानसभा मतदारसंघात आघाडी दिली. अपक्ष निवडून आल्याने खंत आहे. यावेळी बदल अपेक्षित असल्याचे मत शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले. येणारी विधानसभा ही अस्तित्वाची लढाई म्हणून लढूया, मतभेद विसरून भाजपा पराभव करण्याचा निर्धार करण्याचे आवाहन माजी आमदार मनोहर भोईर यांनी केले. शेकापने वेगळी भूमिका घेतल्याने भोईर यांनी महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आणि दिली नाही तरी काम करणार असल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा…डायघरसारख्या घटनेची पुनरावृत्ती नको, निर्जनस्थळी गस्त सुरू करण्याची ठाकरे गटाची मागणी
तसेच पक्षाच्या अंतर्गत मतभेदवर भाष्य करीत सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन करीत मतदारांनी आघाडी दिली त्याचप्रमाणे भाजपने गद्दारी केली असल्याचे आमदार सचिन अहिर यांनी मत व्यक्त केले.संजोग वाघेरे,बबन पाटील,ज्योती ठाकरे आदीजण उपस्थित होते.