पनवेल : मुख्यमंत्री सोमवारी दुपारी साडेबारा वाजल्यापासून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार असल्याने मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्याला रस्त्यातील खड्ड्यांची कळ लागू नये म्हणून युद्धपातळीवर महामार्गातील खड्डे भरले जात आहेत. सोमवारी सकाळी या खड्डेभरण कामाची धडपड करताना सरकारी यंत्रणा दिसली. टी पॉईंट ते पळस्पे फाटा या ३ किलोमीटरच्या अंतरावर तब्बल दोन जेसीबी व दोन ट्रॅक्टर आणि ७० ते ८० मजूरांच्या साह्याने हे खड्डे जेएनपीटी मार्ग ते पळस्पे फाटा या दरम्यान हे काम सूरु होते. दुपारी दिड वाजेपर्यंत पळस्पे फाटा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा पोहचणार आहे. मुख्यमंत्र्यांनी असे पाहणी दौरे महिन्यातून एकदा तरी हाती घ्यावी अशी मागणी वाहनचालकांनी व्यक्त केली. 

मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे अद्याप बुजवले न गेल्याने कोकणवासी चिंतेत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर माजी मंत्री रामदास कदम यांनी याच महामार्गावरील खड्यांमुळे आरोप केल्याने मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे चर्चेत आले. राज्य सरकारने अजून यावर कोणतीही भूमिका मांडली नसल्याने माणगाव येथे कोकणवासीयांनी आंदोलन करुन सरकारचे पुन्हा लक्ष वेधले. त्यामुळे गणेशोत्सवाला ११ दिवस शिल्लक असताना राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी अचानक सोमवारचा पनवेल येथील पळस्पे फाटा ते सिंधुदूर्ग असा रस्त्याच्या कामाची स्थिती पाहण्यासाठी दौरा आखला. विशेष म्हणजे या दौऱ्यात जेएनपीटी ते पळस्पे मार्गावरील टी पॉईंट ते पळस्पे फाटा या मार्ग आणि सेवा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Raigad, Mumbai-Goa highway,
रायगड : संतापलेल्या आंदोलकांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला
badlapur and panvel, tunnel road, mumbai vadodara highway
पनवेल ः अपघाताविना ‘त्यांनी’ खणला ४ किलोमीटरचा बोगदा
Raj Thackeray on Badlapur School Case
Raj Thackeray on Badlapur School Case : बदलापूर प्रकरणी राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप; पोलिसांना म्हणाले, “मुळात या घटनेत…”
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Asphalting of unconcreted roads on Mumbai to Goa highway
गणेशभक्तांच्या खडतर प्रवासावर यंदा डांबरी मुलामा
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?

आणखी वाचा-Panvel Minor Girl Molested : पनवेलमध्ये रिक्षाचालकाकडून ओळखीच्या बालिकेवर अत्याचार

मुख्यमंत्र्यांचा वाहनताफा शीव पनवेल महामार्गाने पळस्पे फाटा येथे पोहचेल अशी माहिती रविवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून सरकारी विभागांतील अधिकाऱ्यांना सांगीतल्याने सरकारी प्रशासनातील अधिकारी निवांत होते. मात्र सोमवारी सकाळी मुख्यमंत्री कार्यालयातून मुख्यमंत्र्यांचा दौरा गव्हाणफाटा मार्गे जेएनपीटी मार्गाने पळस्पे फाट्यावर येणार असल्याची माहिती मिळताच सरकारी प्रशासनाला जाग आली. पनवेल महापालिकेने स्वताच्या प्रशासकीय कक्षा रुंदावून रस्ते स्वच्छ करण्यासाठी तसेच रस्त्याकडेला वाढलेले रान कापण्यासाठी मजूर नेमले होते. त्याव्यतिरीक्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंत्राटदाराला या दरम्यानच्या सेवा रस्त्यावरील दिड ते एक फुटी खड्ड्यामध्ये राडारोडा टाकण्यासाठी यंत्रणा कामाला लावली होती. या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अचानक सरकारी प्रशासनाने खड्यांच्या घेतलेल्या दखलमुळे समाधान व्यक्त केले. दुपारी एक वाजेपर्यंत मजूर टी पॉईंट ते पळस्पे या मार्गावर खड्डे भरणे, राडारोडा टाकणे, वाढलेले गवत कापणे, पेव्हर ब्लॉक बसविणे अशी कामे करताना दिसत होते.