उरण शहरातील जीर्ण व धोकादायक झालेल्या इमारतींचा पुनर्विकास कसा करता येईल या संदर्भात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. उरण तालुका सहकारी गृहनिर्माण महासंघ व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने उरण येथे तेरापंथी सभागृहात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उरणमधील रहिवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला.
रिडेवलपमेंट संदर्भात कायदेशीर बाबींचे मार्गदर्शन
यावेळी महासंघाचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी प्रास्ताविक केले ऍड. श्रीप्रसाद परब यांनी इमारतींचा पुनर्विकास संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी रिडेवलपमेंट संदर्भात कायदेशीर बाबी सांगितल्या. तसेच इमारतींची पुनर्बांधणी म्हणजे काय त्यासाठी काय तरतुदी आहेत. आर्किटेक्टची नेमणूक, पीएमसीची नेमणूक याबद्दल माहिती दिली. तसेच सभासदांनी जागरुक राहून सतर्कता दाखवून संपूर्ण प्रोसेस पूर्ण करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच स्वतः पुनर्विकास कसा करावा विषयी माहिती दिली. सभासदांनी विचारलेल्या कनव्हेन्स डीम कन्व्हेन्स, नॉमिनेशन फॉर्म आदी प्रश्नाबाबत समर्पक उत्तरे दिली. यावेळी उरणमधील गृहनिर्माण संस्थामधील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते