नवी मुंबई : मंदिरातील दानपेटी चोरीचा तपास करत असताना चोरटा पळून जाताना त्याच्या चिखलात उमटलेल्या पाउल खुणाचा अभ्यास करून पोलिसांनी चोरट्याला शोधून काढले. विशेष म्हणजे पाउलखुणातून आरोपी उजव्या पायाने लंगडा असल्याचा समोर आले.आणि एक अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागला. गुरूनाथ तुकाराम वाघमारे, (वय ५४, राहणार मुक्काम खैरासवाडी, पोस्त जिते, तालुका पेण, जिल्हा रायगड). असे यातील आरोपीचे नाव आहे. १ तारखेला सदर आरोपीने आपटा फाटा येथील श्री स्वामी समर्थ मंदिराची दानपेटी चोरी केली होती. तसेच तसेच मंदीराच्या बाजूला राहणारे मंदीराचे विश्वस्त अंजली मिलिंद मुणगेकर, यांच्या घराचे मागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करुन कपाटाचे लॉकर मध्ये ठेवलेले देवीचे वापरातील अडीच लाख रुपये किमतीचे ५ तोळे सोन्याचे दागिने घरफोडी चोरी केली होती. या बाबत पनवेल तालुका पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा