लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवी मुंबई : मैत्रिणीचा गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वतः खाडीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी सापडला. त्याने एनआरआय खाडीत उडी घेतली होती, तर त्याचा मृतदेह बेलापूरच्या खाडीत सापडला. मृतदेह ताब्यात घेत वैद्याकीय तपासणीसाठी प्रथम संदर्भ रुग्णालयात पाठवला आहे. स्वस्तिक पाटील असे त्या युवकाचे नाव असून त्यानेच आत्महत्येपूर्वी त्याच्या मैत्रिणीचा गळा आवळून हत्या केल्याचा संशय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचा परिचय सुमारे दोन वर्षांपूर्वी समाजमाध्यमातून झाला होता. परिचयाचे रूपांतर गाढ मैत्रीत झाले. मात्र मे महिन्यापासून काही वाद झाले आणि दोघांचे भेटणे-बोलणे कमी झाले. गेल्या काही आठवड्यांपासून पुन्हा दोघे भेटू-बोलू लागले. मंगळवार आणि बुधवार दोघेही पूर्णवेळ एकत्र होते. युवतीची महाविद्यालय अंतर्गत परीक्षा बुधवारी होती. पेपर झाल्यानंतर दोघे पुन्हा भेटले व एनआरआय जेट्टी परिसरात गेले. त्याच ठिकाणी दोघांचा वाद झाला असावा आणि रागाच्या भरात स्वस्तिकने मैत्रिणीचा गळा आवळून तिची हत्या केली आणि त्यानंतर जेट्टी पुलावरून उडी घेत आत्महत्या केली.

आणखी वाचा-सुरुंग स्फोटांना ग्रामस्थांचा विरोध, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात ४०० सुरुंग स्फोटांचे नियोजन

त्याने उडी घेताना काही मच्छीमारांनी पाहिले. त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र ओहोटीमुळे त्याला शोधण्यात अपयश आले. पोलिसांनीही अग्निशमन दलाची मदत घेत त्याला शोधण्याचे प्रयत्न केले होते. या युवकाचा मृतदेह शोधण्याची मोहीम बुधवारपासून सुरू होती. अखेर शुक्रवारी सकाळी बेलापूर खाडीत त्याचा मृतदेह सापडला असून त्याच्या नातेवाईकाकडून ओळख पटली आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी दिली.