उरण : पुराचे पाणी ओसरल्यानंतर चिरनेर मध्ये पुरात मोठ्या प्रमाणात वाहून आलेल्या सापाचा धोका वाढला आहे. त्यामुळे गावातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील अनेक घर व परिसरात विषारी व बिनविषारी प्रकारातील साप, घोणस, अजगर आणि इतर जातीचे साप आढळू लागले आहेत.
हेही वाचा… उरण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत ८०५ कुटुंब बाधित
हेही वाचा… नवी मुंबई अग्निशमन अधिकाऱ्याचा इर्शाळवाडीत बचावकार्य करताना मृत्यू
सर्प मित्रांच्या सहाय्याने या सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून दिले जात आहेत. यासाठी चिरनेर गावातील सर्पमित्र जयवंत ठाकूर, राजेश पाटील, विवेक केणी व त्यांचे सहकारी हे गावकऱ्यांच्या मदतीने अडगळीच्या ठिकाणा वरील साप पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडून देण्याचे काम करीत आहेत.