पनवेल: नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्या महिन्यातच ४ लाख ३० हजार प्रवाशांनी या मेट्रोतून प्रवास केला असून मेट्रोच्या तिजोरीत तिकीट विक्रीतून एक कोटी १६ लाख रुपये सिडकोच्या तिजोरीत जमा झाले आहेत. मेट्रो सेवेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे पुढील महिन्यात या मार्गिकेवर अजूनही प्रवासी संख्येत वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

१२ वर्षांनंतर नवी मुंबईतील मेट्रोचा गारेगार प्रवास नवी मुंबईकरांना करता आला. गारेगार प्रवासासोबत विनाविलंबाचा हा प्रवास आहे. यापूर्वी तीन आसनी रिक्षा, एनएमएमटी बससेवा आणि इको व्हॅन यांमधून तळोजा ते बेलापूर असा प्रवास तळोजा नोडमधील नागरिक करत होते.

maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Action will be taken against employees who refuse election work
निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!

अवघ्या १५ मिनिटांत कोणताही अडथळा न राहता सध्या तळोजा ते बेलापूर प्रवाशांना तातडीने प्रवास करता येत आहे. सिडको मंडळाने नवी मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी २९५४.१४ कोटी रुपये खर्च केला असून सिडकोला या मार्गिकेवर दिवसाला ९८ हजार प्रवासी या सेवेचा लाभ घेतील अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्याच महिन्यात दिवसाला सरासरी १४,३३३ प्रवाशांनी केलेल्या प्रवासामुळे अजून काही महिन्यांत प्रवासी संख्येचे ते उदिष्ट सिडकोला गाठता येईल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा… नवी मुंबई : गवताला आग लावतं कोण? आणि का? गूढ कायम 

सोमवार ते शुक्रवार वगळता सुट्टीच्या शनिवार व रविवार या दोन दिवसांत मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. शहराची नवी मेट्रो म्हणून सहकुटुंब पर्यटन म्हणून आणि फेरफटका मारण्यासाठी येणारा हा प्रवासी वर्ग या ठिकाणी पाहायला मिळतो. बेलापूर, खारघरचे सेंट्रल पार्क आणि पेणधर या स्थानकांमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

मुंबई मेट्रोपेक्षा या मेट्रोचे तिकीट दर जास्त असल्याने ते कमी करण्याची मागणी सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्यमंत्र्यांकडे येथील प्रवाशांनी केली. मात्र ही मागणी तेवढ्या गंभीरतेने सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली नाही.

दररोज ६५ फेऱ्या, रिक्षाचालकांच्या लुटमारीला चाप

दररोज ११ स्थानकांमधून ६५ अप आणि ६५ डाऊन मार्गिकेवर फेऱ्या होत आहेत. पहिल्या महिन्यात ४ लाख ३० हजार ७९ प्रवाशांनी या मेट्रोचा लाभ घेतला. या सेवेमुळे रिक्षातून आणि इकोव्हॅनमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली. एनएमएमटी बसचे तिकीट दर मेट्रोपेक्षा कमी असल्याने या बसच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला नाही. बेलापूर ते तळोजा या पल्ल्यासाठी तीन आसनी रिक्षाचालक विनामीटरने बेकायदा भाडे आकारत रिक्षाचालकांच्या या लुटमारीला चाप बसला.

सिडको मेट्रोला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. महिन्याभरात ४ लाख ३० हजार प्रवाशांनी मेट्रोसेवेचा लाभ घेतला. सिडको # jabwemetmetro आणि # CIDCO या हॅशटॅगवर मेट्रो प्रवासाचे फोटो, रिल्स शेअर केले जात आहेत. ‘आपली मेट्रो’ या भावनेतून नवी मुंबईकरांचे मेट्रोबरोबर एक अनोखे नाते निर्माण झाले आहे. नोकरदारांसोबत सुटीच्या दिवशी सिडकोच्या सेंट्रल पार्क उद्यानाला भेट देणाऱ्यो पर्यटक प्रवाशांची संख्या मोठी आहे. प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको मंडळ