नवी मुंबई शहरात पामबीच मार्ग , ठाणे बेलापूर मार्ग, एमआयडीसीमधील रस्ते व सायन पनवेल महामार्ग अशा अनेक मार्गावर दिवाबत्तीसाठी हजारो दिवे लावण्यात आले आहेत.परंतू जवळजवळ सर्वच विभागात कमी अधिक प्रमाणात पथदिवे डोळे मिचकावतात. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत .त्यामुळे रस्त्यावर लवकर काळोख पडत असल्यानेपथदिवेही लवकरात लवकर लावण्याची गरज आहे.रस्त्यावरील अपुऱ्या प्रकाशामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.त्यामुळे याबाबत पालिकेने योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.शहरातील हजारो पथदिवे नव्याने बसवण्यात आले आहेत. शहरात वारंवार पथदिवे कोसळण्याच्या घटना घडत असतात. शहरात सातत्याने वर्दळीचा भाग असल्याने वाहन चालवताना प्रत्येकाने खरदारी घेतली पाहीजे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरात ३० पेक्षा पथदिवे पडून काही दुर्घटनाही घडल्या त्यामुळे शहरातील खराब झालेले पथदिवे बदलले. शहरातील सुमारे ३० हजार खांबांपैकी १७ हजार पथदिवे कालबाह्य झाले होते.परंतू ते नव्याने बसवले असूननवी मुंबई शहरात नियोजनबध्द शहर वसवलेल्या सिडकोकालीन अनेक पथदिवे बदलण्यात आलेले आहेत. त्यामुळे हेपथदिवे केव्हाही कोसळू लागले होते. शहरातील सिडकोकालिन अनेक पथदिवे केव्हाही माना टाकायला लागले होते ते पालिकेने बदलले आहेत. नवी मुंबई शहरात एकूण ३० हजार पथदिवे आहेत.त्यातील जवळजवळ १७ हजार पथदिवे कालबाह्य झाल्याने बदलले असले तरी हेच पथदिवे योग्य वेळेत सुरु करण्याची मागणी करण्यात येत आहे . पावसाळ्यात बऱ्याच वेळा ढगाळ हवामानामुळे रस्त्यावर काळोख असतो.परंतु संध्याकाळच्या वेळी रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांच्या लाईट लागलेल्या असतात परंतु पालिकेचे पथदिवे बंद असल्यामुळे पालिकेने याबाबत योग्य खबरदारी घेण्याची मागणी नागिकांकडून करण्यात येत आहे

हेही वाचा : सुधारगृहातून पलायन केलेल्या मुलीची रवानगी पुन्हा बालसुधारगृहात

शहरातील ३० हजारांपैकी १७ हजार नवे एलईडी दिवे लावले …

पथदिवे कोसळण्याच्या वारंवार घटना घडत असल्याने पालिकेने नवे पथदिवे लावले असून या एलईडीच्या दिव्यांमुळे रस्त्यावर चांगला उजेड पडत आहे.परंतु ते योग्य वेळी सुरु होण्याची आवश्यकता आहे

हेही वाचा : शारीरिक संबंधासाठी नकार दिल्यामुळे मारहाण करून युवकाचा प्रेयसीवर बलात्कार

शहरात पथदिवे कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या त्यामुळे पथदिवे बदलले आहेत.संबंधित विभागांची पाहणी करुन दिवाबत्ती का उशीरा सुरु केली जाते याबाबत योग्य ती काळजी घेण्यात येईल. शहरातली पथदिवे ऑटोमॅटिक पद्धतीने सुरू होतात. त्यामध्ये काही तांत्रिक अडचण आहे का तपासण्यात येईल. – संतोष मोरजकर अभियंता,विद्युत विभाग

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the light of the vehicles on the road the street lights flash navi mumbai palm beach thane belapur tmb 01