नवी मुंबई : टेलीग्रामद्वारे संपर्क करून युटयुब वरील चॅनेल लाईक व सबस्क्राईब करून जास्तीची रक्कम कमविण्याचे आमिष दाखवून फसवणुक करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आरोपी केवळ १९ वर्षांचा असला तरी आंतरजालचा वापर करून आता पर्यंत त्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असून त्याच्या विरोधात भारतभर ९ गुन्ह्यांची नोंद आहे. याच प्रकरणातील अन्य एक आरोपीचा शोध सुरु असून पकडलेल्या आरोपीचा तो भाऊच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बुधाराम झुंझाराम देवासी (वय १९ वर्षे, रा. ११७, विनायक नगर, गणेश मंदिराजवळ, सांग्रिया, जोधपुर, राजस्थान ) असे अटक आरोपीचे नाव आहे. ८ सप्टेंबरला टेलिग्रामद्वारे आरोपीने फिर्यादी यांच्याशी संपर्क साधला. फावल्या वेळेत काम करून सहज लाखो रुपये कमावू शकता असे आमिष दाखवण्यात आले. यासाठी आम्ही सांगेल त्या युटयुब वरील चॅनेल लाईक व सबस्क्राईब करा. त्याद्वारे तुम्हाला चांगला पैसे मिळू शकतो असे सांगण्यात आले. काही दिवसांनी टास्क देण्यात आले म्हणजे एवढ्या दिवसात एवढ्या चॅनेल लाईक व सबस्क्राईब केले पाहिजे. तसेच त्यांना एक लिंक पाठवून त्याद्वारे खाते उघडण्यास सांगितले. त्याच खात्यात तुम्ही केलेल्या कामाचे पैसे येणार असल्याचे सांगितले. काही दिवस काम केल्यावर संबंधित खात्यातील पैसे दिसत होते मात्र काढता येत नव्हते असे लक्षात आले. त्यामुळे पुन्हा फिर्यादी यांनी आरोपीशी संपर्क केला असता कर, उपकर, सेवा कर असे विविध कारणे सांगून दिलेल्या खाते क्रमांकावर पैसे भरण्यास सांगितले, त्यानुसार थोडे थोडे करीत फिर्यादी यांनी तब्बल ४३ लाख ४५ हजार ३०० रुपये भरले. तरीही कामाचे पैसे मिळत नसल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक संदर्भात पत्र दिले त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास वेगात सुरु केला.
आणखी वाचा-नामांकित कंपन्यांच्या नावाने खाद्य तेलात भेसळ करणारी टोळी उध्वस्त, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
यासर्व घटना ८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर दरम्यान घडल्या. फिर्यादी यांनी ज्या बॅक खाते मध्ये रक्कम पाठविली होती त्या बँक खातेची माहिती प्राप्त करून तांत्रिक विश्लेषण केले असता फसवणुकी करिता वापरलेले बॅक खाते राजस्थान येथील बुधाराम देवासी यांचे नावे असल्याची माहिती समोर आली. आरोपीने जोधपुर येथील बॅकेतुन चेकद्वारे काढण्यात आल्याची माहिती तपासामध्ये प्राप्त झाली. सदर गुन्हयामध्ये बुधाराम देवासी यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी सदर ठिकाणी पोलीस उप निरीक्षक बंडगर व पथक राजस्थान येथे पाठवले. पथकाने जावुन शोध घेतला असता आरोपी बुधाराम झुंझाराम देवासी आढळून आला. त्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला रोजी सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तसेच सदर गुन्हा आरोपी बुधाराम देवासी याने त्याचा भाऊ रामनिवास देवासी याचे सोबत मिळून केला असल्याचे कबुली दिली असल्याने आरोपी रामनिवास देवासी याचा शोध सुरू आहे.फिर्यादी यांनी फसवणुकीची रक्कम भरलेल्या सर्व बॅंक खाते गोठविणे याबाबत तात्काळ पत्र व्यवहार करून सदर बँक खात्यांन मध्ये एकुण – ३५ लाख ९६ हजार २८५ रुपये एवढी रक्कम गोठविण्यात सायबर पोलीस ठाणेस यश आले आहे.अटक अरोपीचा महाराष्ट्र राज्यातील तसेच भारत देशातील विविध राज्यातील असे एकुण ०९ सायबर तक्रारी मध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त, विशाल नेहुल,यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर, पोलीस हवालदार . अल्पेश पाटील, पोलीस नाईक रविराज कांबळे, पोलीस शिपाई भाऊसाहेब फटांगरे, पो.शि. एकनाथ बुरूगंळे, पुनम गडगे यांनी उघडकीस आणला आहे.
गजानन कदम ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे) टेलिग्राम, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप तसेच इतर समाज माध्यमावर अर्धवेळ नोकरी संधीच्या जाहिराती बनवुन जास्त नफा देण्याचे अमिष दाखवुन युजर्संना आकर्षित करून ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याचे बहाण्याने त्यांनीच बनविलेल्या ग्रुप मध्ये अॅड करून ग्रुप वर जास्तीचे फायदा झाल्याचे स्किन शॉट पाठवुन जास्तीत जास्त गुंतवणुक करण्यास भाग पाडुन फसवणूक करतात.याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, टेलिग्राम, इंस्टाग्राम तसेच इतर सोशल मिडीया वर पार्ट टाईम नोकरीचे जाहिरातींची खात्री करा, त्यांना आपली कोणतीही वैयक्तिक माहिती देवु नका आणि कोणतेही अर्थिक व्यवहार करू नका.