नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी तरण तलावात अग्नेल शाळेत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्यांचा स्विमिंग पुलात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मयूर ढमाले असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो नेरुळ येथे राहत असून फादर अग्नेल शाळेत अकरावीत शिकत होता. आज एक ते दीडच्या सुमारास क्रीडा तासिकेत पोहण्यासाठी असलेल्या समूहास (बॅच) पोहण्याचे धडे दिले जाणार होते. त्यासाठी विद्यार्थ्यांना स्विमिंग पुलात उतरविण्यात आले. यात अनेकांना पोहता येत होते, मात्र पोहण्याच्या विविध स्पर्धेसाठी पोहण्याचे प्रशिक्षण दिले जात होते.

हेही वाचा…पनवेल : शौचालयाला पाणी मागितल्याने गृहनिर्माण संस्थेच्या सचिवाकडून महिलेला शिवीगाळ 

मात्र पाण्यात उतरलेला मयूर हा खोल पाणी असलेल्या क्षेत्रात गेला व तेथेच बुडाला. हे लक्षात येई पर्यंत त्याची शुद्ध हरपली होती. त्याला रुग्णालयात दाखल केले तेथेच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत निष्काळजी पणामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांनी दिली आहे. याबाबत प्रयत्न करूनही संबंधीत शाळा प्रतिनिधीची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agnel school 17 year old student drowns in navi mumbai swimming pool psg