नवी मुंबई : आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत काँग्रेस पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत. नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करत रमाकांत म्हात्रे यांनी पक्ष सोडला आहे. पुढील काही दिवसांतच महाराष्ट्र युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष असलेला त्यांचा मुलगा अनिकेत म्हात्रे आणि माजी महापौर असलेल्या पत्नी मंदाकिनी म्हात्रे यासुध्दा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत माजी महापौर रमाकांत म्हात्रे यांचा मुलागा अनिकेत म्हात्रे ऐरोली विधानसभा निवडणुकीतून लढण्याच्या तयारीत होता. परंतु ही जागा काँग्रेसने शिवसेना उबाठा गटाला सोडली आणि एम. के मढवी यांना उमेदवारी देण्यात आली. तसेच नवी मुंबईत पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनीही निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे कमळ हाती घेतले.

रमाकांत म्हात्रे यांचे अशोक चव्हाण यांच्याशी असलेले सख्य सर्वश्रुत होते. परंतु चव्हाण यांनीही कमळ हाती घेतले त्यानंतर काँग्रेसमध्ये अनेक उलटफेर पाहायला मिळाले. दरम्यान, नवी मुंबई कॉग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद नाईक यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही. विधानसभा निवडणुकीत ऐरोली विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी अनिकेत म्हात्रे यांनी तयारी केली होती. मात्र नाना पटोले यांनीच भाजपशी सलगी करुन ४ कोटींच्या बदल्यात काँग्रेसचा दावा सोडला होता. पक्षात सुरू असलेल्या या अनागोंदीमुळे नाराज होऊन मी राजीनामा दिला. मुलगा व पत्नीही काही दिवसांतच कॉंग्रेसला राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. रमाकांत म्हात्रे, माजी उपमहापौर