नवी मुंबई : ऑल इंडिया मजलीस-ए- इत्तेहादुल मुसलिमिन अर्थात ‘एआयएमआयएम’च्या पाहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाचा एक टप्पा पार पडला. यात १६ राज्यांतील प्रतिनिधींचे मत जाणून घेण्यात आले व पक्षप्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मार्गदर्शन केले. एकंदरीत आजच्या बैठकीतून निघालेल्या निर्णयाबाबत खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकारांना माहिती दिली. त्यानुसार आता एमआयएम आयटी सेल उभारणार असून यासाठी मेहनत घेतली जाणार आहे. याद्वारे पक्षाचा प्रचार करण्यात येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले जलील यांनी सांगितले. राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचा अजेंडा ठरविण्यासाठी देशातील पाच लोकांची सदस्यीय समिती तयार करण्यात येणार आहे. देशातील कोणते पक्ष एमआयएमबरोबर येतील याची चाचपणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, कोणत्या पक्षाबरोबर आघाडी युती करायची हे संबंधित राज्यांतील नेत्यांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या नंतरचे राष्ट्रीय अधिवेशन हैदराबादमध्ये होणार असल्याचेही जलील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – रायगड : द्रोणागिरी डोंगराला पुन्हा वणवा; वणवा की लावलेली आग?

हेही वाचा – नवी मुंबई : हवालदाराचा दारू पिऊन धिंगाणा

मुस्लीम समाजाला साद घालण्याचे काम भाजपा करीत असली तरी या देशात धार्मीक तेढ वाढवून जातीय सलोखा खराब करणाऱ्या भाजपाबरोबर मुस्लीम जनता जाणार नाही, असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला.