नवी मुंबई: मागील एक महिन्यांपासून कोपरखैरणे,वाशी आणि कोपरी मध्ये रात्री आणि सकाळच्या वेळी धूसर वातावरण निदर्शनास येत आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक देखील खालावत आहे. परिसरातील नागरिकांच्या तक्रारी ही वाढतच आहेत. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ,  नवी मुंबई महानगरपालिका , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे रात्री या विभागात स्थळपहाणी दौरा केला. मात्र या पहाणी दौऱ्यात वातावरणात धुके आढळले, परंतु रासायनिक मिश्रित हवेचा वास जाणवला नाही. तर हवेच्या गुणवत्ता अहवालामध्ये बेन्झीन व टोलीनचे प्रमाण रात्रीच्या वेळी जास्त आढळून आले.  एपीएमसी बाजार व शीव-पनवेल महामार्ग तसेच तुर्भे-ठाणे रोड येथे रात्रीच्या वेळी असणारी वाहतूकिची वर्दळ व तापमानात होणारी घट हे धुरकट वातरणाचे  मुख्य कारण असू शकते अशी नोंद अहवालात करण्यात आली आहे. या अहवालावर मात्र स्थानिक रहिवाशी समाधानी नसून त्रयस्थ संस्थेमार्फत हवा गुणवत्ता तपासणी करावी अशी मागणी जोर धरत आहे.

 नवी मुंबईतील वाशी सेक्टर २६, कोपरी गाव सेक्टर २८, कोपरखैरणे सेक्टर ११ या परिसरातील वायुप्रदूषण नित्याचे झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या वाढत्या तक्रारीने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने याठिकाणी हवा गुणवत्ता फिरते तपासणी वाहन तसेच नवी मुंबई महापालिकेने धूळ शमान यंत्रणा कार्यवनीत केले आहे. तरी देखील या विभागात रात्री आणि सकाळी धुरकट वातावरण निदर्शनास येत आहे. वाशी सेक्टर २६, २८, कोपरी गाव येथील गामी निवासी प्रकल्प येथे स्वयंचलित वातावरणीय हवा गुणवत्ता मोजमापण वाहन द्वारे दिनांक ६ सप्टेंबरपासून ते दिनांक ४ऑक्टोबर पर्यंत हवेची गुणवत्ता तपासणी करण्यात आली. हवेच्या गुणवत्ता अहवालामध्ये बेन्झीन व टोलीनचे प्रमाण रात्रीच्या वेळी जास्त आढळून आल्याची नोंद करण्यात आली आहे.  एपीएमसी बाजार व शीव- पनवेल महामार्ग तसेच तुर्भे ठाणे रोड येथे रात्रीच्या वेळी असणारी वाहतूकिची वर्दळ व तापमानात होणारी घट हे यामागचे मुख्य कारण असू शकते अशी नोंद प्रदूषण मंडळाच्या अहवालात करण्यात आली आहे. बुधवारी रात्री १२.४५ ते २ वाजेपर्यंत स्थळ पाहणी केली. या पहाणीदरम्याण रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत धुसर  वातावरण दिसून येते. सकाळी ७ नंतर वातावरणातील धूर नाहिसा होतो. सदर परिसरात रासायनिक स्वरूपाचा वास रात्री-पहाटे आढळून आला नाही. एपीएमसी बाजार व एम. आय. डी. सी. मधील वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यांच्या कडेला असलेल्या कच्या शोल्डर मुळे धूळ उत्सर्जीत होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
Mumbai citizens suffer from cold and cough due to polluted air
प्रदुषित हवेमुळे मुंबईकर सर्दी, खोकल्याने त्रस्त
experienced cold temperatures for past few days cold will remain in Mumbai till end of month
मुंबईत महिनाअखेरीपर्यंत गारठा कायम राहणार
leopard Amravati, leopard died Amravati, Amravati,
अमरावती : वाहनाच्या धडकेत पुन्‍हा एका बिबट्याचा बळी

हेही वाचा >>>उरण-पनवेल मार्गावरून एसटी सुरू करण्यासाठी बोकडवीरा, फुंडे, डोंगरी व पाणजे गावातील महिलांचे धरणे आंदोलन

महाराष्ट्र प्रदूषण मंडळ,नवी मुंबई महापालिका आणि एमआयडीसीने बुधवारी संयुक्तरित्या पहाणी केली. ल पहाणी दरम्यान वातावरण धूसर आढळे,पंरतु यामध्ये कोणताही रासायनिक स्वरूपाचा वास जाणवला नसून, हे धुरकट वातावरण एपीएमसी बाजार पेठ आणि महामार्गावरील वाहन वर्दळीमुळे आहे अशी नोंद केली आहे. या अहवालावर स्थानिक रहिवाशी समाधानी नसून महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने त्रयस्थ संस्थेकेडून पुन्हा तपासणी करून घ्यावी, याबाबत लेखी निवेदन महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला देण्यात येणार आहे.-संकेत डोके, अध्यक्ष, नवी मुंबई विकास अधिष्ठान

Story img Loader