नवी मुंबई: मागील एक महिन्यांपासून कोपरखैरणे,वाशी आणि कोपरी मध्ये रात्री आणि सकाळच्या वेळी धूसर वातावरण निदर्शनास येत आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक देखील खालावत आहे. परिसरातील नागरिकांच्या तक्रारी ही वाढतच आहेत. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, नवी मुंबई महानगरपालिका , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे रात्री या विभागात स्थळपहाणी दौरा केला. मात्र या पहाणी दौऱ्यात वातावरणात धुके आढळले, परंतु रासायनिक मिश्रित हवेचा वास जाणवला नाही. तर हवेच्या गुणवत्ता अहवालामध्ये बेन्झीन व टोलीनचे प्रमाण रात्रीच्या वेळी जास्त आढळून आले. एपीएमसी बाजार व शीव-पनवेल महामार्ग तसेच तुर्भे-ठाणे रोड येथे रात्रीच्या वेळी असणारी वाहतूकिची वर्दळ व तापमानात होणारी घट हे धुरकट वातरणाचे मुख्य कारण असू शकते अशी नोंद अहवालात करण्यात आली आहे. या अहवालावर मात्र स्थानिक रहिवाशी समाधानी नसून त्रयस्थ संस्थेमार्फत हवा गुणवत्ता तपासणी करावी अशी मागणी जोर धरत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा