लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण : उरण तालुक्यात विविध ठिकाणी मंगळवारी पहाटे धुके पसरले होते. गेल्या काही दिवसांपासून धुकेसदृश वातावरण निर्माण झाल्याने पावसाने परतीचा मार्ग धरल्याची शंका व्यक्त केली जात आहे. तसेच पावसाने दडी मारल्यापासून उरणचा हवा गुणवत्ता निर्देशांक १५० वर पोहोचला.

उरण परिसरात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे वातावरण तप्त झाले आहे. त्यातच मंगळवारी पहाटे वातावरणात धुके पसरले होते. तर दुसरीकडे पावसाने संपूर्ण आभाळ आच्छादले होते. या वातावरणामुळे उष्णता, धुके आणि पावसाचे वातावरण निर्माण झाले होते.

आणखी वाचा-जेट्टीअभावी जुहू गावातील मच्छीमारांची गैरसोय

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत हिवाळ्यात धुके निर्माण होते. मात्र ऑगस्ट महिन्यातच हे धुके पसरू लागले आहे. उरणच्या प्रदूषणात मागील दोन-तीन वर्षांपासून वाढ झाली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक देशात आणि जगात प्रथम क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक ३०० पार जाऊ लागला आहे. मागील दोन महिने चांगला पाऊस झाल्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारला होता. मात्र मंगळवारी ६० वरून हा निर्देशांक १५० वर जाऊन पोहोचला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air quality index at 150 in uran taluka mrj