उरण: दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने उरणच्या हवामानात सुधारणा झाली आहे. अतिशय वाईट हवेची उच्चांकी निर्देशांकाने गाठली होती. त्यात घट झाली असून उरणचा हवा गुणवत्ता निर्देशांक ३९ वर आला आहे. हवा प्रदूषण घटले आहे, त्यामुळे अनेक दिवसांनी शुद्ध हवेचा श्वास उरणच्या नागरिकांना घेता येत आहे.
सोमवारी अडीच वाजता मिळालेल्या आकडेवारी नुसार उरणच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३९ वर आला होता. त्याचप्रमाणे वातावरणातही बदल जाणवत होता. उरण तालुका आणि परिसरात मोठया प्रमाणात प्रदूषणात वाढ झाली आहे. येथील रस्ते, मातीची खोदकाम, दगड उत्खनन, दररोज जाळण्यात येणारा कचरा यामुळे धुळीकणात वाढ झाली होती. यामध्ये वाढत्या उष्णतेचीही भर पडत आहे.
हेही वाचा… मुंबई मेट्रो एवढे नवी मुंबई मेट्रोचे तिकीट भाडे ठेवा
मात्र रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार आणि सोमवारी दुपारी आलेल्या सरींमुळे वातावरणातील तापमानात घट झाली आहे. तर जोरदार पावसाने हवेतील धूलिकण नष्ट केल्याने हवेतील हा बदल जाणवू लागला आहे.