नवी मुंबई: नवी मुंबई शहरात आज ही औद्योगिक पट्यालगत असलेल्या वाशी- कोपरखैरणे विभागात वायू प्रदूषण कायम आहे. मागील आठवड्याभरापासून वाशी, कोपरखैरणे आणि कोपरी विभागात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण जाणवत होते. याबाबत तक्रारी, बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर अखेर प्रदूषण मंडळाने प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी वाशी से. २६ मध्ये फिरते हवा गुणवत्ता तपासणी वाहन कार्यान्वित केले आहे.

एकीकडे शहरात स्वच्छता ठेवण्यात येत असली तरी दुसरीकडे सध्या शहरात औद्योगिक कंपन्यांमधून रात्रीच्या वेळी रासायनिक मिश्चित वायू सोडून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण केले जात आहे. रात्री १२ नंतर एमआयडीसी मधील कंपन्या हवेत दूषितवायू सोडत असून याचा त्रास मात्र येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे . औद्योगिक वसाहतीतील रबाळे, पावणे येथील कंपन्या थंडीच्या दिवसात धुक्यांचा आसरा घेत मोठ्या प्रमाणावर हवेत रासायनिक मिश्चित वायू सोडतात.

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
50 to 60 school students hospitalised after lpg gas leak at jsw company in jaigad
जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये एलपीजी वायू गळती; नांदिवडे माध्यमिक विद्यालयाच्या ५० ते ६० विद्यार्थ्यांना त्रास
Graded Response Action Plan project to monitor air pollution Pune news
पिंपरी: हवा प्रदूषणावर आता ‘ग्रॅप’ची नजर; प्रदूषण करणारे उद्योग…
badlapur east gas spread loksatta news
बदलापूर पूर्वेत पसरला रासायनिक वायू; रहिवाशांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास, वायूगळतीचा संशय
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
mazgaon bkc among most polluted areas due to nitrogen dioxide levels increase
माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल सर्वाधिक प्रदूषित; नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीत वाढ
vasai air pollution
वसईत सिमेंट कारखाने व रेडिमिक्स वाहतुकीमुळे प्रदूषण वाढले

हेही वाचा… माणुसकी शून्य आणि ओतप्रोत माणुसकी दोन्हीचे दर्शन 

मात्र आता पावसाळ्यात ही मागील आठवड्यापासून एमआयडीसी मधील कंपन्यांचे वायु प्रदूषण करण्याचे सत्र सुरू झाले आहे. रात्री १२ नंतर जेव्हा परिसरातील रहिवाशी निद्रा मनस्थितीत असतात . त्याचवेळी या कंपन्यांकडून हवेत दूषित धुलीकन सोडले जात आहेत. परिणामी रहिवाशांना या वायू प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. रात्री अचानकपणे हवेत जास्त धुळीकण दिसत असल्याचे स्थानिक रहिवाशी यांना जाणवते. हवेत अचानक निर्माण झालेल्या धुळीकणामुळे नागरिकांना उग्र वास येत आहे. त्यामुळे श्वास घेताना अडचणी निर्माण होत आहे. दर्प वासामुळे उलटी, मळमळ सारख्या त्रासांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा… विना परवाना वृक्षतोड करणाऱ्यांना उद्यान विभाग पाठीशी घालत आहे का?

वाशी, बोनकोडे ,कोपरी गाव, कोपरखैरणे, घणसोली हे विभाग औद्योगिक वसाहतीला लागून आहेत. त्यामुळे या विभागात वायुप्रदूषणाचा अधिक परिणाम जाणवत आहे. या विरोधात कारवाई करावी म्हणून वाशी सेक्टर २६ मधील रहिवाशांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे सातत्याने तक्रारी देखील करीत आहेत. याची दखल घेऊन प्रदूषण मंडळाने सेक्टर २६ मध्ये वायू प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी फिरते हवा गुणवत्ता तपासणी वाहन कार्यान्वित केले आहे. या वाहनात स्वंयचलीत यंत्रणा आहे. याद्वारे हवेची गुणवत्ता आपोआप व अचूक मोजली जाणार. यामध्ये प्रदूषण पातळी तसेच कोणते प्रदूषके आहेत यांची नोंद देखील टिपली जाणार आहे. त्यामुळे वायू प्रदूषण करणाऱ्यां सबंधितांवर कारवाई करणे सोयीस्कर ठरेल अशी माहिती प्रदूषण मंडळाने दिली आहे.

वाशी-कोपरी परिसरात वायू प्रदूषणाबाबत तक्रारी येत आहेत. त्यामुळे याठिकाणी फिरते हवा गुणवत्ता तपासणी वाहन कार्यान्वित केले आहे. या वाहनात स्वयंचलित यंत्रणा असल्याने वायू प्रदूषणाची पातळी व त्यामधील प्रदूषके यांची अचूक नोंदी ठेवणार आहे. प्रदूषण पातळी आणि प्रदूषक महिती प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यास सोयीस्कर होणार आहे. – जयंत कदम, उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, नवी मुंबई.

Story img Loader