गेल्या काही वर्षांपासून उरणसह नवी मुंबई, मुंबई या शहरातील समुद्र, खाडी किनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचे आगमन होत आहे. आता नवी मुंबईतील ऐरोली खाडी किनारी रोहित पक्षी(फ्लेमिंगो)ची आगमन झाले असून पुढील कालावधीत या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे आता फ्लेमिंगोला सुरुवात झाली असल्याने पुढील आठवड्यात सागरी जैवविविधता केंद्रातील बोटिंग सफर सुरू होणार असल्याची माहिती वनविभाग अधिकारी यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>एका रात्रीत १० वेळा दूरध्वनी करुन ‘तो’ पत्रकार पोलिसांची धावपळ उडवतोय; अखेर पोलिसांनी उचलले ‘हे’ पाऊल

नोव्हेंबरमध्ये फ्लेमिंगो पक्षाच्या आगमनाची चाहुल लागते. मात्र यंदा शहरात फ्लेमिंगो उशिराने दाखल झाले आहेत. गुजरातच्या कच्चमधून हजारो किमीचा प्रवास करून हे परदेशी पक्षी समुद्रकिनारी किंवा पाणथळ भागात येत असतात. तसेच नोव्हेंबर ते जास्तीत जास्त जून महिन्यापर्यत वास्तव्यास असतात. यावर्षी उशिरा आगमन होत आहे. ऐरोली खाडी किनारी फ्लेमिंगो पक्षांच्या आगमनाला सुरुवात झाली असून साधारणता ३०० ते ४०० फ्लेमिंगो खाडीकिनारी स्थलांतरित झाले आहेत. ऐरोली खाडी किनारी फ्लेमिंगो दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच पर्यटकांना फ्लेमिंगो पाहण्यासाठी बोटिंग सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती ऐरोली सागरी जैवविविधता केंद्र वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादूरे यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airoli bay coast exotic flamingo birds amy