उरण: चिरनेर मधील अक्कादेवी धरण सप्टेंबरमध्येही जोराचा पाऊस सुरु असल्याने ओव्हरफ्लो होत आहे. त्यामुळे पर्यटकांना आंनद लुटण्याची संधी मिळत आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या चिरनेर गावातील अक्कादेवी धरण हे पावसाळ्यात भरुन वाहते. त्यामुळे येथील फेसाळणाऱ्या पाण्याचा व हिरव्या गार निसर्ग रम्य डोंगर रांगाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक कुटुंबासह मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे हे धरण हाऊसफुल्ल होतं.
हेही वाचा… पनवेलमध्ये ३२१ गणेशमूर्तींचे दान
चिरनेर हे इतिहास प्रसिद्ध गाव असल्याने या गावातील श्री महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी व २५ सप्टेंबर १९३० सालच्या सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पावसाळ्यात नवीमुंबई, पनवेल,पेण, ठाणे उरण परिसरातील अनेक गणेशभक्त, पर्यटक नागरीक ये- जा करत असतात. यावर्षी अक्कादेवी धरण हे पावसाळ्यात भरुन वाहत असल्याने अशा फेसाळणाऱ्या पाण्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही पुरुष, महिला, लहान मुले आणि विशेष करुन तरुण वाँटरफाॅलची मजा घेण्यासाठी येत आहेत.