लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल: पनवेल पालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि खासगी शाळा शनिवारी बंद ठेवण्याचे परिपत्रक पालिकेने गुरुवारी रात्री प्रसिद्ध केले. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने खारघर येथील कॉर्पोरेट पार्क येथील मैदानावर सन्मानित करण्यात येणार असल्याने शुक्रवारपासून (ता.१४) पनवेलच्या विविध भागांत राज्यभरातील विविध ठिकाणांहून श्री-सदस्य एकवटण्यास सुरुवात होईल. यामुळे खबरदारी म्हणून पनवेलच्या विविध शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये यासाठी पालिकेने खबरदारी म्हणून शाळा बंदची घोषणा केली आहे. पालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके यांनी याबाबत गुरुवारी रात्री परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली. सुमारे २० लाख श्री-सदस्य खारघर येथे रविवारी पुरस्कार सोहळ्यासाठी एकवटणार असल्याने शनिवारपासून श्री-सदस्य पनवेलमध्ये दाखल होण्याचा अंदाज पालिकेने बांधला आहे.

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे बस, रेल्वे, हलक्या वाहनांमधून ८ लाख ४३ हजार २४० श्री-सदस्य येतील. तसेच खासगी बसमधून ९ लाख १५ हजार ७६०, खासगी मोटारीतून ७७ हजार श्री-सदस्य येणार असे नियोजन धर्माधिकारी प्रतिष्ठानने केले आहे. ही सर्व वाहने १६ हजार ६५० असतील. मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्याकरिता टाटा मेमोरिअल कॅन्सर रुग्णालय, गुरुद्वारा, गोल्फचे मैदान, उत्सव चौक, खारघर स्टेशन, मुंब्रा-पनवेल महामार्ग, शीव-पनवेल महामार्गाने येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहनतळासाठी तीन वेगवेगळ्या बाजूंना वाहने उभी करण्याची सोय केली आहे.

कोकण, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ या ठिकाणांहून वाहने येतील. कोपरा, मुरबी गावाचे मैदान, एक्सस्टोर, खारघर सेक्टर-१६, कळंबोली येथील केएलई महाविद्यालय, रोडपाली येथील क्रीडा मैदान, खांदेश्वर रेल्वे स्टेशन मैदान, रोडपाली सेक्टर-२० अंतर्गत रस्ते, कामोठे अंतर्गत रस्ते येथे वाहनांना उभे राहण्याची सोय केली आहे.

गुजरात, उत्तर प्रदेश, जव्हार, वाडा, पालघर, डहाणू, भिवंडी असे परराज्य आणि इतर ठिकाणांहून येणाऱ्या वाहनांसाठी भारती विद्यापीठ मैदान, खारघर उत्सव चौक, सेक्टर- ५, ६, ७ उत्सव चौक, खारघर सेक्टर- १९, २०, सीबीडी स्थानक वाहनतळ, सेक्टर-११ अंतर्गत रस्ते आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

नाशिक, धुळे, जळगांव, नंदूरबार, जालना, संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, मध्य प्रदेश आदी ठिकाणांहून येणाऱ्या वाहनांसाठी पेटगांव, खडकी ग्राऊंड, तळोजा, इनामपुरा ग्राऊंड- १, २, ओवे कॅम्प ग्राऊंड, अमनदूत स्टेशन रोड, वास्तुविहार रोड, तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे वाहने उभी करण्याची सोय केली आहे.