नवी मुंबई: क्रिप्टो करेंसी मध्ये पैसे गुंतवल्यावर अल्पवधीत भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. वेळीच कारवाई केल्याने फसवणूक करणाऱ्याचे बँक खाती गोठवली असून त्यात ३२ कोटी सहासष्ठ लाख बारा हजार एक्यानव एवढी मोठी रक्कम आहे. 

बाळु सखाराम खंडागळे (वय ४२ वर्षे) व राजेंद्र रामखिलावन पटेल (वय ५२ वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोघेही घाटकोपर येथे राहतात. २८ एप्रिल ते ९ ऑगस्ट या कालावधीत फिर्यादी यांना अर्चना नायर असे बनावट नाव सांगणाऱ्या महिलेने क्रिप्टो करंसीमध्ये ट्रेड केल्यास मोठया प्रमाणात फायदा होत असल्याचे अमिष दाखवले होते.

हेही वाचा… जनसंवाद कार्यक्रम ऐन गर्दीच्या वेळी,वाशीत प्रचंड वाहतूक कोंडी, पायी दोन मिनिटांच्या अंतराला गाडीने २० मिनिटे

फिर्यादी यांना  आरोपींनी  दिलेल्या विविध बँक खाते मध्ये एकुण सहा कोटी बासष्ट लाख एकोणीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी भरण्यास भाग पाडले. मात्र महिन्यात परतावा सांगून कुठलाच परतावा दिला नाही तसेच संपर्क हि बंद झाल्याने फिर्यादी यांनी सायबर शाखेत गुन्हा नोंद केला  सदर गुन्हयाचा तपास सायबर पोलीस ठाणे, नवी मुंबई यांचे मार्फतीने चालु होता.

सायबर शाखेने तात्काळ संबंधित बँकेशी पत्रव्यवहार करून  फसवणुकीची रक्कम भरलेल्या सर्व बँक खाते गोठविण्याबाबत सूचना केली आरोपीताने फसवणुकी करिता वापरलेले विविध बँक खाते गोठवून एकुण बत्तीस कोटी सहासष्ठ लाख बारा हजार एक्यानव्य  ऐवढी रक्कम गोठवण्यात  सायबर पोलीस ठाणे, नवी मुंबई यांना यश आले आहे.

हेही वाचा… जनसंवाद दौरा: २०२४ आमचेच – बावनकुळे 

गुन्ह्यात वापरलेले बॅक खाते क्रमांक तसेच मोबाईल क्रमांकाचे विश्लेषण केले असता संशयीत इसमाचे घाटकोपर, मुंबई येथे वास्तव असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याअनुषंगाने सदर परिसरात शोध घेवुन  बाळु सखाराम खंडागळे ,  राजेंद्र रामखिलावन पटेल,  यांना अटक केले .  आरोपीताकडे केलेल्या तपासामध्ये सदर आरोपीत यांनी त्यांचे बँक खाते तसेच बँक खातेशी संलग्न मोबाईल क्रमांक, धनादेश पुस्तक , एटीएम कार्ड हे काही लोभा पोटी गुन्हयातील पाहिजे आरोपीताकडे दिले असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच अटक आरोपी हे बाहेरील राज्यातील अन्य संशयीत आरोपीतांचे संपर्कात असल्याचे निष्पन्न होत असुन त्याबाबत अधिक तपास चालू आहे. या  गुन्हयाची विशेष तांत्रिक तपासाची कामगिरी हि नवी मुंबई पोलीस आयुक्तलयातील पहिली सायबर गुन्हे विश्लेषण करणारी महिला पोलीस पुनम गडगे यांनी केली आहे.अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी दिली. 

आरोपींनी अनेकांची फसवणूक केली असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच यात राज्यातील व परराज्यातील काही संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत.

Story img Loader