नवी मुंबई : गावी जाण्यासाठी उर्वरित पगाराची मागणी करणाऱ्या सुताराला मुकादम आणि त्याच्या इतर साथीदारांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता सुताराला इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून खाली ढकलून दिले. सुदैवाने ते वाचले. याप्रकरणी मुकादम आणि इतर चारजणांविरोधात पोलिसांनी हत्येचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

अखिलेश चौरसिया, रामशरण निषाद अशी आरोपींची नावे असून या व्यतिरिक्त दोनजणांची ओळख पटलेली नाही. एकूण चार आरोपी आहेत. अमरपाल निषाद असे यातील फिर्यादीचे नाव आहे. अमरपाल हा सुतार काम करतो. नवी मुंबईतील सानपाडा या ठिकाणी एका इमारतीचे बांधकाम सुरू असून त्याच ठिकाणी अमरपाल हे काही महिन्यांपासून सुतारकाम करतात. या बांधकाम साईटवर अखिलेश चौरसिया हा मुकादम म्हणून काम पाहतो. अमरपाल यांना गावी जायचे असल्याने त्यांनी मागील दिड महिन्याचा पगार द्या म्हणून विनवण्या केल्या. १७ मार्चला दिवसभराचे काम संपल्यावर त्यांनी पुन्हा रात्री ९ च्या सुमारास अखिलेश यांच्याकडे पगाराची मागणी केली. त्यावेळी त्याने व इतर आरोपींनी अमरपाल यांना बेदम मारहाण केली व त्यांना तिसऱ्या माळ्याच्या पार्किंगमधून खाली ढकलून दिले.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Cook on Chief Minister Varsha bungalow Arvi constituency
मुख्यमंत्र्यांच्या वर्षां बंगल्यावरील खानसामा ‘ ईथे ‘ काय करतोय ?
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

हेही वाचा – नवी मुंबई : स्वतःच्या लहान मुलीस बेदम मारहाण करणाऱ्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा 

हेही वाचा – नवी मुंबई महापालिकेची थकबाकीदारांसमोर ढोल वाजवून कर वसुली; सानपाडा येथील फुल स्टॉप मॉलमधील ८ युनीट सील

या घटनेत अमरपाल वाचल, तरी त्यांची पाठ, हनुवटीला गंभीर दुखापत झाली असून अंगावरही खूप ठिकाणी खरचटले आहे. अमरपाल यांना अन्य कामगारांनी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर बोलण्याच्या स्थितीत आल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांनी दिलेल्या जबाबावर पोलिसांनी चार आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.