नवी मुंबई: गेल्या चार ते पाच महिन्यापासून स्थिर असलेले टोमॅटोच्या दराने उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारात टोमॅटोचे दर वधारले आहेत.  परराज्यातून आणि महाराष्टातुन होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचे भाव वाढले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. बाजारात बुधवारी ४८ गाडी आवक झाली असून घाऊक मध्ये ८  रुपयांनी तर किरकोळ बाजारात दुपट्टीने वाढ झाली आहे. घाऊक मध्ये आधी २०-२४रुपयांनी उपलब्ध असलेले टोमॅटो आता २८-३२ रुपयांवर पोचले आहेत.

  वाशीतील एपीएमसी बाजारात टोमॅटो कमी प्रमाणात दाखल होत आहे. परिणामी आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे दरवाढ झालेली आहे. मागील आठवड्यात २ हजार क्विंटलहुन अधिक टोमॅटो दाखल होत होते ते आता १हजार ८००क्विंटल दाखल होत आहेत. पावसामुळे उत्पादन खराब होत तसेच  शेताततून उत्पादन घेण्यास अडचणी येत आहेत, त्यामुळे बाजारात आवक कमी झाली आहे. महाराष्ट्रतुन सातारा,सांगली आणि संगमनेर तर बंगळूर मधून टोमॅटो दाखल होतात. मागील वर्षी जुलै मध्ये टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला होता. किरकोळ बाजारात १५० ते १८० रुपयांवर तर घाऊक बाजारात १०० ते ११० रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र ऑगस्टनंतर टोमॅटोचे दर उतरले होते ते आतापर्यंत टोमॅटोचे दर आवाक्यात होते. मात्र आता पुन्हा टोमॅटोच्या दाराने उसळी घेतली असून घाऊक बाजारात प्रतिकिलो २८ ते ३२रुपये तर किरकोळ बाजारात  ८० रुपयांनी विक्री होत आहे.

Story img Loader