छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते पनवेल या लोकलमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून असल्याची घटना घडली आहे. आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मात्र, अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटली नसून पोलिस याबाबतचा अधिक तापस करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- ‘हिंदू गर्वगर्जना यात्रा’; दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी

पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरु

शेवटचा थांबा असल्याने पनवेल रेल्वे स्थानकात गाडी पूर्ण रिकामी झाली. त्यावेळी काही प्रवाशांनी बोगीत एक निपचित पडलेला व्यक्ती असल्याचे रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ जाऊन पाहणी केली असता सदर व्यक्ती मृत झाल्याचे निदर्शनास आले. त्याला पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तो मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. छ. शिवाजी महाराज टर्मिनल पासून पनवेलपर्यंत अनेक स्थानके असून ती व्यक्ती नेमकी कुठे बसली याची पाहणी करण्यात येणार आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ असून त्याच्याकडे त्याची ओळख पटेल असे कुठलेही कागदपत्रे मिळून आली नाहीत. पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पनवेल रेल्वे पोलीस वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रवीण पाडवी यांनी माहिती दिली.