नवी मुंबई –नवी मुंबई शहरात मागील आठवडाभरापासून शहरात पाणीटंचाई जाणवत असताना दुसरीकडे नागरीकांना पुरवठा केलेले पाणी अतिशय गढुळ असून असे पाणी आम्हाला पिण्यासाठी पुरवठा करता तर पालिका अधिकाऱ्यांंनी हे गढूळ पिऊन दाखवावे असा संताप नागरीकांनी नेरुळ पालिका विभाग कार्यालयात केला. तर नागरीकांना स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा करता येत नसेल तर पाणी स्वच्छ करण्याचे पालिकेने फिल्टर वाटप सुरु करावे असा संतप्त सवाल नागरीकांनी केला आहे.

नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात एमआयडीसीमार्फत २ व ३ जून रोजी दुरूस्ती कामांसाठी शटडाऊन घेण्यात आला होता.त्यानंतर ७ जूनला नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण मुख्य जलवाहिनीवर व भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथे मान्सूनपूर्व पाणीपुरवठासंबंधी आवश्यक कामे करण्याकरिता शटडाऊन घेण्यात आले होते.त्यातच १० जूनला नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण प्रकल्पाची २०२४ मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी आदई गावाजवळ फुटल्यामुळे महापालिका क्षेत्रात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला होता. सदर दुरूस्ती काम तातडीने हाती घेऊन अहोरात्र काम करून युध्दपातळीवर काम पूर्ण करण्यात आले होते. परंतू पालिकेने पाणीपुरवठा सुरू केला पंरतू बेलापूर ते संपूर्ण नवी मुंबईक्षेत्रात गढुळ पाण्याचा पुरवठा सुरु झाल्यामुळे हे पाणी प्यायचे तरी कसे यामुळे बाटलीबंद पाणी विकत घेण्याची वेळ नागरीकांवर आली. त्यानंतरही सातत्याने शहरात गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरीकांचा संताप अनावर झाला असून पालिका व त्यांचे अधिकारी पाणीपुरवठ्याकडे नीट लक्ष देत नसल्यामुळे शहरात आरोग्याला हानीकारक पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे आज सोमवारी जुईनगर विभागातील भाजपचे पदाधिकारी विजय साळे यांनी नेरुळ विभाग अधिकारी कार्यालयात धाव घेत आम्हाला असे पाणीपुरवठा करता व स्वतः बिसलरी बॉटलमधील पाणी पिता असा संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना गढुळ पाणी पाजण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे नवी मुंबई शहरात होणारा पाणीपुरवठा हा घातक असून अश्या पाण्यामुळे कॉलरा तसेच अनेक आजार उद्भभवण्याची शक्यता डॉक्टरांकडूनही व्यक्त करण्यात येत आहे. तर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर अशा प्रकारे गढुळ पाणीपुरवठा त्यातच पाणीतुटवडा यामुळे नागरीक अधिक संतप्त झाले आहेत. पालिकेने स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा केला नाही तर पालिका आयुक्त व कार्यकारी अभियंता व शहर अभियंता यांना हे गढुळ पाजण्याचा इशारा साळे यांनी दिला आहे. याबाबत पालिका आयुक्त राजेश नार्वेकर व शहर अभियंता संजय देसाई यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही.

nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर

नवी मुंबई महापालिकेत मागील काही दिवसापासून वारंवार पाणीपुरवठा खंडीत होत असून शहरात अतिशय गढुळ पाणीपुरवठा होत असल्याने अनेक आजार नागरीकांना होण्याचा धोका आहे. त्यामुळे पालिका वारंवार देखभाल दुरुस्ती करते तेव्हा पालिकेचे अभियंता काय करतात असा प्रश्न निर्माण झाला असून पाणीपुरवठा लाईन खराब झाल्यामुळे व गंजल्यामुळे पाईपलाईन फुटून पाणीपुरवठा खंडीत झाला याला अधिकारीच जबाबदार असून सामान्य नागरीकांना गढूळ पाणी व अधिकारी स्वच्छ पाणी कार्यालयात पितात म्हणून त्यांना गढूळ पाणी पिण्याचा आग्रह करत आवाज उठवला आहे. – विजय साळे, भाजप पदाधिकारी

Story img Loader