लहान व मोठे प्राणी, भटके श्वान आणि पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पीपल्स फॉर अ‍ॅनिमल संस्था, टाटा ट्रस्ट यांच्या सयुक्तिक खर्चातून दक्षिण नवी मुंबईतील स्मार्ट सिटीमध्ये कळंबोली येथे चार हजार चौरस मीटर भूखंडावर प्राणी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मागील आठवडय़ात याच रुग्णालयाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ‘पीपल्स फॉर अ‍ॅनिमल’ या संस्थेला सिडको प्रशासनाने या रुग्णालयासाठी कळंबोली येथील सेक्टर ९ मध्ये चार हजार चौरस मीटरचा भूखंड दिला असून पुढील तीन वर्षांत या रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊन येथे पक्षी व प्राण्यांसाठी मोठे सुसज्ज रुग्णालय खुले होणार आहे.

सुमारे चार हजार चौरस मीटर जागेवर दुमजली इमारतीमध्ये प्राणी व पक्ष्यांसाठी हे रुग्णालय सुसज्ज पद्धतीने उभारले जात आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी सुमारे ८ कोटी रुपये खर्च टाटा ट्रस्टकडून खर्च केला जाणार आहे. ‘पीपल्स फॉर अ‍ॅनिमल’ संस्थेसोबत प्रत्यक्षात रुग्णालयाच्या व्यवस्थापनात टाटा ट्रस्टच्या देखरेखीखाली हे रुग्णालय चालविले जाणार आहे. रायगड जिल्ह्य़ातील ग्रामीण परिसरातील बैल, गाय अशा प्राण्यांसाठी तसेच कर्नाळा पक्षी अभयारण्यातील विविध प्रजातींच्या जखमी पक्ष्यांसाठी हे रुग्णालय वरदान असणार आहे. सिडको प्रशासनाकडून  ‘पीपल्स फॉर अ‍ॅनिमल’ संस्थेने ऑक्टोबर २०१४ पूर्वी निविदा प्रक्रिया करून सेक्टर ९ मधील भूखंड क्रमांक ७ व ९ असे २ हजार चौरस मीटर जागेचे भूखंड ताब्यात मिळाले. त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या प्राण्यांसाठी लागणारे मोठय़ा हॉलची व शस्त्रक्रियेसाठी अपुरी जागा लक्षात घेता या संस्थेच्या प्रमुख मनेका गांधी यांनी सिडकोकडे अजून जागेची मागणी केली होती. याच मागणीनंतर सिडकोने निविदा प्रक्रिया केली. त्यामध्ये संस्थेला ८६ लाख रुपयांमध्ये अजून एक हजार ९९९ चौरस मीटरचा भूखंड देण्यात आला. टाटा ट्रस्टच्या या संस्थेसोबतच्या करारामुळे अमेरिकेतील प्राण्यांसाठी झटणाऱ्या संस्थेला या रुग्णालयातील सुसज्ज यंत्रणेसाठी नेमण्यात आले आहे.

  • आधुनिक पद्धतीचे प्राण्यांचे शस्त्रक्रिया केंद्र येथे उभारले जाईल.
  • प्राण्यांसाठी येथे फिजिओथेरेपीची सोय असणार आहे. तसेच प्राणी व पक्ष्यांसाठी परिचारिकांचे शिक्षण येथे देण्याचे अ‍ॅनिमल संस्थेने ठरविले आहे.
  • सिडको परिसरातील प्राणी व पक्ष्यांना या रुग्णालयात ४० टक्के सुविधा मोफत दिली जाण्याचा करार भूखंड देताना सिडको प्रशासनाने ‘पीपल्स फॉर अ‍ॅनिमल’ संस्थेसोबतच्या करारामध्ये केला आहे.