पावसाअभावी फळधारणाच नाही; एपीएमसीत दररोज एक गाडी

कमी पावसाचा अंजीर बागांना मोठा फटका बसला आहे. ६० ते ७० टक्के बागांना फळधारणाच झाली नसल्याने या वर्षी अंजीराचा दिवाळी बहर शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. त्याचा परिणाम बाजारातही दिसून येत आहे. एपीएमसीच्या फळ बाजारात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पहिल्याच आठवडय़ात १४ क्विंटल अंजीर आले होते. यंदा मात्र एकच गाडी आली आहे.

Sandy Irvine 100 years later
Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? अर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Minimum Support Price for Agricultural Produce
शेतमालाला हमीभाव नाहीच ; केंद्राच्या धडपडीनंतरही शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान
Randeep Surjewala promised Rs 7000 per quintal for soybeans if Maha Vikas Aghadi wins
सत्तेत आल्यास सोयाबीनला ७ हजार रुपये हमीभाव…रणदीप सिंग सुरजेवाला यांची घोषणा…
Prime Minister Narendra Modis announcement to give guaranteed price of 6 thousand for soybeans
सोयाबीनला सहा हजारांचा हमीभाव देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
farmers anger continues in 70 constituencies over soybean msp
७० मतदारसंघांत सोयाबीन ‘रोष’

सध्या सफरचंद, डाळिंब आणि सीताफळ या फळांचा हंगाम सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये वेध लागतात ते अंजीराचे. मात्र कमी पावसाचा या बागांना मोठा फटका बसला आहे. अंजीरासाठी प्रसिद्ध पुरंदर तालुक्यातील दिवाळी बहर मोठय़ा प्रमाणात एपीएमसीच्या फळबजारात येतो. याबाबत पुरंदर तालुक्यातील अंजीर उत्पादक शेतकरी नारायण जाधव यांनी या वर्षी पावसाअभावी फळधारणा झालीच नसल्याचे सांगितले.

दरवर्षी दिवाळी बहारात ६० ते ७० टक्के बागा धरल्या जातात, या वर्षी  १० ते २० टक्केच बागा धरल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे ७५ टक्के नुकसान झाले आहे.

४० नगाला  २०० ते ३०० रु.

नोव्हेंबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत अंजीरचा हंगाम असतो. १० नोव्हेंबरनंतर अंजीरची आवक वाढण्यास सुरुवात होईल, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. सध्या बाजारात एक गाडी दाखल होत असून ४० नगाला २०० ते ३०० रु. बाजारभाव आहे.

नोव्हेंबर महिन्यात अंजीरच्या हंगामाला सुरुवात होते. परंतु तुरळक पावसामुळे फळ परिपक्व होण्यास उशिरा सुरुवात झाली आहे. म्हणून बाजारात सध्या अल्प प्रमाणात अंजीरची आवक झाली आहे.

– संजय पिंपळे, घाऊ क व्यापारी, एपीएमसी फळ बाजार