नवी मुंबई: आशियातील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत आवारातील शौचालय घोटाळा समोर आल्यानंतर आता पर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अटक केलेले दोघे कंत्राटदार होते तर आता स्वच्छता अधिकारी असणाऱ्या सिद्राम नागोराव कटकधोंड याला अटक करण्यात आली आहे. कटकधोंड याला १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय अर्थात स्वच्छतागृह वाटप तसेच कंत्राट पोटी वसूल करण्यात येणाऱ्या देयक संदर्भात झालेल्या घोटाळ्यात तब्बल  ७ कोटी ६१लाख ४९हजार ६८९ रुपयांचे  नुकसान एपीएमसी प्रशासनाचे झाले असल्याचा ठपका तपास अधिकाऱ्यांनी ठेवला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह  अन्य सात असे एकूण आठ जणांच्या विरोधात ११ नोव्हेंबरला  गुन्हा नोंद करण्यात आला होता. 

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
dharavi protestors give preference to toilets
धारावी बचाव आंदोलनकर्त्यांचा वचननामा जाहीर, शौचालयाला प्राधान्य
Meenakshi Seshadri Romantic rain song while she having diarrhea
सेटवर एकच शौचालय, पावसात रोमँटिक गाण्याचं शूटिंग अन्.., मीनाक्षी शेषाद्रीने सांगितला अतिसार झाल्यावर चित्रीकरणाचा वाईट अनुभव
pune puram chowk loksatta
पुणे : पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले

हेही वाचा… नैना बचाव विरुद्ध नैना हटाव असा संघर्ष पनवेलमध्ये होण्याची शक्यता

याबाबत कारवाई करीत सुरेश मारू आणि मनीष पाटील या दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. तर शुक्रवारी उशिरा स्वच्छता अधिकारी असणाऱ्या सिद्राम नागोराव कटकधोंड याला अटक करण्यात आली आहे. कटकधोंड याला न्यायालयाने १४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी फर्मावली आहे, अशी माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी दिली. यापूर्वीच आमदार शशिकांत शिंदे यांना अटक पूर्व जामीन मंजूर झालेला आहे.