पनवेल ः सिडकोच्या जलवाहिन्यांवर बसविण्यात आलेले जलमापके चोरी होत असल्याने काही महिन्यांपूर्वी बालकांना कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर जलमापकांची चोरी थांबली होती. मात्र पुन्हा एकदा कळंबोली येथील सिडको मंडळाच्या पाणी विभागाच्या कार्यालयात रहिवाशी जलमापके चोरी होण्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कळंबोली येथील बैठ्या चाळींमध्ये (एल. आय. जी.) जलवाहिनीवर सिडको मंडळाने बसविलेली जलमापके दिवसाला ८ पेक्षा अनेक चोरली जात असल्याने रहिवाशी वैतागले आहेत. नेमके कोण चोरी करतो यासाठी काही जागरुक नागरिक व गृहिणींनी पाळत ठेवली तरी जलमापकांची चोरी होत आहे. चोर न सापडल्याने रहिवाशांनी सिडकोच्या कार्यालयातील पाणीपुरवठा विभागात येऊन लेखी तक्रारी दिल्या आहेत.

हेही वाचा – उरण : जोरदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा, भात पिकांवरील रोगाचा प्रतिबंध होण्यास मदत

हेही वाचा – नवी मुंबई : ४७ शाळा सीसीटीव्हीविना, सखी सावित्री तसेच विशाखा समितीबाबतही शाळांचे दुर्लक्ष

यापूर्वी जलमापके चोरी जात असल्याने हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले होते. पोलिसांनी पाळत ठेऊन काही बालकांना या प्रकरणात ताब्यात घेतले होते. तसेच संबंधित बालकांचा एक गट भंगार व्यावसायिकाला चोरी केलेले जलमापके विक्री करत असल्याची ध्वनीचित्रफीतसुद्धा समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली होती. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another theft of water meters in kalamboli ssb