मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालक मंडळांच्या ७ संचालकांचा त्यांच्या स्थानिक एपीएमसी मधील कार्यकाळ संपल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती येथील संचालक पदे ही रद्द करण्यात आली होती. मात्र पणन मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील सूनावणी होईपर्यंत या आदेशाला स्थगिती दिली होती . आज शुक्रवारी याबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात येणार होती. मात्र काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे . पंरतु या सुनावणी मध्ये संचालक मंडळ सदस्य राहणार की त्यांचे पद रद्द होणार. संचालक पद रद्द झाल्यास एपीएमसी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त होणार का? त्यामुळे एपीएमसी मध्ये पुन्हा नव्याने निवडणूक होणार का? अशा चर्चा सध्या बाजार वर्तुळात सुरू आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in