वाशीतील एपीएमसी बाजारात सध्या हापूसच्या आंब्याची आवक वाढली असून दरात घसरण पहावयास मिळत आहे. सध्या बाजारात देवगडच्या ३०० ते ३२५  पेट्या दाखल झाल्या आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत प्रतिपेटी दरात २ ते ३ हजार रुपयांची घसरण झाली आहे. मागील आठवड्यात ३७ ते १३० पेट्या दाखल झाल्या होत्या ,त्यामुळे हापूसचे दर चढेच होते . प्रतिपेटी ५ ते १० हजार रुपयांनी विक्री होत होती.  आगामी कालावधीत बाजारात  हापूसची आवक वाढेल तसे  दर उतरतील असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कुठूनही ११२ डायल करा, हवी ती मदत मिळणार …..

डिसेंबर महिन्यापासून एपीएमसी फळ बाजारात अंजीर, स्ट्रॉबेरी,हापुस आंबा या फळांचा हंगाम सुरू होत असतो. यंदा बाजारात या सर्व फळांचा हंगाम उशिराने सुरू झाला आहे. अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल उष्ण दमट हवामान यामुळे फळांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात स्ट्रॉबेरी, अंजीर दाखल होण्यास विलंब झाला असून हापूसला ही उशिराने सुरुवात झाली.  मागील आठवड्यात एपीएमसीत हापूसची आवक कधी ३० पेट्या तर कधी १०० ते १५० पेट्या दाखल होत होत्या, परंतु या आठवड्यात सोमवारी बाजारात ३०० ते ३२५ पेट्या दाखल झाल्या असून  दर ही उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी हापूस ४ ते ८ डझन हापूसच्या पेटीला ५ ते १० हजार तर परिपक्व पिकलेल्या हापुसची १२ ते १५ हजार रुपयांपर्यंत विक्री झाली आहे. तेच सोमवारी ३०० हुन अधिक पेट्या दाखल झाल्या असून दरात २-३ हजारांची घसरण झाली आहे. मार्च मध्ये आवक मोठया प्रमाणात सुरू होईल त्यावेळी दर आणखीन उतरतील असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा >>> ‘व्हॅलेंटाईन डे’चं पत्नी, बहिणीकडून अनोखे गिफ्ट ठरले संजीवनी

स्ट्रॉबेरी आवक रोडावली एपीएमसी बाजारात सोमवारी हापूसची आवक वाढली असली तरी स्ट्रॉबेरीची आवक मात्र कमी झाली आहे. मागील आठवड्यात महाबळेश्वरचे ४ ते ५ हजार क्रेट तर नाशिकच्या १० गाड्या स्टोबेरी दाखल होत होती.  परंतु आज सोमवारी बाजारात महाबळेश्वरची केवळ १६००क्रेट   तर नाशिकचे अवघ्या ३ गाड्या दाखल झाले आहेत. आवक कमी असूनही दर मात्र स्थिर आहेत.  बाजारात महाबळेश्वर स्ट्रॉबेरी प्रतिकिलो २००-३२०रुपये तर नाशिकची स्ट्रॉबेरी १ पनेट १००-१२० रुपये दराने विक्री होत आहे. एका पनेट मध्ये साधारणता दोन ते अडीच किलो स्ट्रॉबेरी असते. नाशिकच्या तुलनेत महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला भरपूर मागणी असल्याने दोघांच्या दरात तफावत पहावयास मिळत आहे.  महाबळेश्वर स्ट्रॉबेरीच्या तुलनेत नाशिकची स्ट्रॉबेरी निम्म्या दराने विक्री होत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apmc market get large quantities of devgad hapus mangoes zws