नवी मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एपीएमसी मार्केटमधील माथाडी कामगार संघटनेने बंद पुकारला होता. त्यामुळे आज दिवसभर एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्यात आला. यात कांदा बटाटा, मसाला आणि धान्य मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळला गेला असून भाजी आणि फळ बाजार समिती मात्र बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या दोन्ही बाजारांचे व्यवहार नियमित प्रमाणे सुरू होते.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी छेडलेल्या मराठा आंदोलनास माथाडी कामगारांनी पाठिंबा जाहीर केलाय. यासाठी एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारण्यात आला.  मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मार्केटमध्ये माथाडी कामगारांची एक बैठक पार पडली होती. या बैठकीला कामगार नेते शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. एपीएमसीमधील एकूण पाच मार्केटपैकी तीन मार्केटचे व्यवहार पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे कायम गजबजलेल्या मार्केटमध्ये पूर्ण शुकशुकाट होता.

हेही वाचा – उरण : बोरी नाका परिसरातील भंगार गोदामाला आग

हेही वाचा – उरण : सकाळीच जेएनपीटी वसाहतीसमोर एनएमएमटी बस नादुरुस्त, ऐनवेळी भर रस्त्यात बस बंद झाल्याने प्रवासी त्रस्त

दिवाळीच्या तोंडावर हा संप पुकारल्याने सुका मेवा, तसेच फराळ बनविण्याचे पदार्थ विक्री, आकाशदिवे, सजावट साहित्य, विद्युत रोषणाई आदींचा ठोक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाला होता. तिन्ही मार्केट मिळून अंदाजे ९० ते १०० कोटींची उलाढाल बंद होती

Story img Loader