लोकसत्ता, पूनम सकपाळ
नवी मुंबई: मुंबई महानगराला कृषी मालाच पुरवठा करण्याऱ्या सर्वात मोठा बाजारपेठा पुनर्विकासाच्या उंबरठ्यावर आहेत. एपीएमसीने सादर केलेल्या अर्थसंकल्पात एपीएमसीतील कांदा बटाटा प्रवेशद्वाराच्या बाजूच्या मोकळ्या भूखंडावर वाणिज्य संकुल उभारणी, नवीन कार्यालय, कांदा बटाटा बाजार पुनर्बांधणी, फळ, भाजीपाला, धान्य बाजारांचे संरचनात्मक परीक्षण आणि मॅफकोतील मोकळ्या भूखंडावर व्यवसायिक गाळे उभारणी प्रस्तावित आहे. त्यामुळे आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे.
कांदा बटाटा प्रवेशद्वाराच्या बाजूच्या मोकळ्या भूखंडावर वाणिज्य संकुल उभारणी, नवीन कार्यालय, कांदा बटाटा बाजार पुनर्बांधणी, फळ, भाजीपाला, धान्य बाजारांचे संरचनात्मक परीक्षण आणि मॅफकोतील मोकळ्या भूखंडावर व्यवसायिक गाळे उभारणी प्रस्तावित आहे. त्यामुळे आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे.
हेही वाचा… बाजारात मेथीची जुडी खातेय भाव! किरकोळीत एक जुडी पन्नाशीवर
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असून सिडको निर्मित उभारणी केलेल्या इमारतींची आजमितीला दुरावस्था झाली आहे. इमारती मोडकळीस तसेच धोकादायक यादीत समाविष्ट आहेत . यामध्ये विशेषतः कांदा बटाटा बाजार आघाडीवर आहे. मागील महिन्यात एपीएमसीतील भेटी दरम्यान पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील शंभर दिवसात एपीएमसीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करू असे आश्वासन दिले आहे.
सन २०२३-२४च्या अर्थसंकल्पात प्रशासनाने एपीएमसीच्या पुनर्विकासावर जोर दिला असून या अर्थसंकल्पात पुनर्बांधणीसाठी भरीव तरतूद केली आहे. कांदा-बटाटा बाजार आवारातील गाळेधारक पुर्नबांधकामामध्ये गुंतवणूक करण्यास तयार नसल्याने या गाळयांच्या पुर्नबांधकामासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी बाजार समितीने आवक गेट येथे एल शेप आकाराची कॉम्प्लेक्स उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. कांदा-बटाटा पुर्नबांधकाम १कोटी , कांदा-बटाटा बाजार एल शेप बांधकाम ५ कोटी रुपयांची तरदूत केली आहे.
हेही वाचा… एपीएमसी बाजार समिती शीतगृह देणार भाड्याने
बाजार समितीतील विविध इमारती मजबूतीकरणासाठी १२कोटींची तरदूत केली आहे. कांदा-बटाटा मार्केट येथील मुख्यालय इमारत, मसाला मार्केट येथील मध्यवर्ती इमारत, फळ मार्केट येथील मध्यवर्ती इमारत, फळे भाजीपाला मार्केट येथील निर्यातदार इमारत व भाजीपाला बाजार सर्व इमारतींना २० वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला असून त्याचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले आहे. या इमारतींची दुरुस्तीसाठी तब्बल १२कोटी खर्च अपेक्षित आहे. बाजार समितीच्या मार्केट-१ या बाजार आवारातील मध्यवर्ती सुविधा इमारत नवी मुंबई महानगर पालिकेने आतिधोकादायक घोषित केली आहे. या इमारतीच्या पुर्नबांधकामाकरीता १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पात पुनर्बांधणीवर अधिक भर दिला आहे. त्यामुळे आगामी काळात एपीएमसी पुनर्विकासाला लवकरच सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे.
कांदा बटाटा लिलावगृह ठिकाणी बहुउद्देशीय इमारत
कांदा-बटाटा बाजार आवारात सुमारे २५ हजार चौ. फुटाचे लिलावगृह असून या लिलावगृहामध्ये सद्यस्थितीत बिगर गाळा अनुाप्तीधारक व्यापारी व्यवसाय करत आहेत. लिलावगृहाच्या ठिकाणी बहुउद्देशीय इमारत उभारण्याचे बाजार समितीने प्रस्तावित केले असून अर्थसंकल्पात याकरिता ५ कोटींची तरतूद केली आहे. या प्रस्तावित इमारतीमध्ये तळ मजल्यावर बिगर गाळा धारकांसाठी लिलावगृह पहिल्या मजल्यावर या व्यावसायिकांसाठी कार्यालये, त्यावरील मजल्यांमध्ये सॉटींग/ग्रेडींग/पॅक हाऊस नियोजित करून निर्यातदारांसाठी चालना देण्याचे नियोजित आहे. तसेच कांदा-बटाटा बाजार आवारातील पुर्नबांधकाम करतांना या लिलावगृहामध्ये ट्रान्झीट कॅम्पची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.
मॅफकोतील भूखंडावर व्यवसायिक गाळे उभारणी
मॅफको कडून खरेदी करण्यात आलेल्या साधारणतः ६३४८ चौ.मी. क्षेत्रफळावर गोदाम, दुकाने व कार्यालये व्यावसायिक गाळे उभारण्यात येणार आहेत. या इमारतीमध्ये तळ मजल्यावर चार गोडावून्स, पहिल्या मजल्यावर २५ कार्यालये, दुकाने प्रास्तावित आहेत. या प्रकल्पासाठी साधारणतः ५२कोटी ४३ लाख खर्च अपेक्षित असून त्याकरीता सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ५ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.
अर्थसंकल्पातील महत्वाचे प्रकल्प
- कांदा बटाटा बाजाराच्या प्रवेशद्वारावर वाणिज्य संकुलाची (मॉल) उभारणी करून त्याच्या निधीतून कांदा बटाटा बाजाराचा पुनर्विकास प्रस्तावित.
- कांदा बटाटा लीलाव गृहाच्या ठिकाणी बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम
- कांदा-बटाटा बाजार येथील मुख्यालय इमारत, मसाला, फळ बाजारातील मध्यवर्ती इमारत, फळे भाजीपाला मार्केट येथील निर्यातदार इमारत व भाजीपाला बाजाराचे संरचनात्मक परीक्षण आणि दुरुस्ती
- खत निर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे.
- बाजार समितीच्या मार्केट-१ मधील मध्यवर्ती सुविधा इमारतीचे पुर्नबांधकाम
- मॅफकोतील भूखंडावर व्यवसायिक गाळे उभारणी