नवी मुंबई : शौचालय घोटाळा प्रकरण ताजे असतानाच एपीएमसी मधील चटई क्षेत्र (एफ.एस.आय) घोटाळा समोर आला आहे. २००८ ते २०१३ दरम्यान सभापती संचालक आणि एपीएमसी सचिव यांनी संगनमताने घोटाळा केल्याचा ठपका ठेवत २३ संचालक सभापती आणि एका सचिवा विरोधात शासनाची फसवणूक , विश्वासघात, सरकारी व्यक्ती असून शासनाची फसवणूक, संगनमत करणे अशा गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यात साताऱ्याचे विद्यमान (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) उमेदवार शशिकांत शिंदे आणि च शौचालय घोटाळा प्रकरणी नुकतेच अटक केलेले फळ बाजार समितीचे माजी संचालक संजय पानसरे यांचा समावेश आहे. त्यामुळे साताऱ्याचे एनसीपीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
दिलीप काळे, (सभापती) , विजय देवतळे (उपसभापती), भानुदास कोतकर, (संचालक), दत्तात्रय पाटील (संचालक), प्रदिप खोपडे (संचालक), प्रभु पाटील (संचालक), अशोक वाळुंज (संचालक), शंकर पिंगळे (संचालक), किर्ती राणा (संचालक),जयेश वोरा (संचालक), सोन्याबापु जनार्दन भुजबळ (संचालक), विलास मारकड (संचालक), बाळासाहेब हणमंतराव सोळस्कर, (संचालक), भिमकांत बाळाराम पाटील (संचालक), पांडुरंग पुरूषोत्तम गणेश (संचालक) १७) श्री विलास रंगरावजी महल्ले (संचालक), संजय नारायण पानसरे (संचालक), चित्राताई दिगंबर लुंगारे, (संचालक), बेबीनंदा प्रभाकर रोहिणकर (संचालक), डॉ.जितेंद्र अंकुश देहाडे (संचालक), चंद्रकांत रामदास पाटील (संचालक),राजेश गंगाधरराव देशमुख कुंटुरकर (संचालक), शशिकांत जयवंतराव शिंदे (संचालक), संजय उर्फ नाना गजानन आंबोले (संचालक) आणि सुधीर तुंगार (सचिव), असे यातील आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा…उरण : वाढल्या उन्हाच्या झळा, वन्यजीवांसाठी भरला पाण्याचा तळा
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत २००८ ते २०१३ या कालावधीत या घोटाळा प्रकरणी विशेष लेखा परीक्षक प्रकाश मांढरे यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेत एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी, नवी मुंबई येथील बाजार आवारातील बाजार समिती आवार क्रमांक एक मधील विकास टप्पा दोन मध्ये ८२ हजार २७९ चौरस मीटर चटई क्षेत्र पैकी ५० हजार चौरस मीटर चटई क्षेत्र वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार ४६६ गाळे धारकांना एकूण ४ लाख ४३ हजार ३९१. ६६ चौरस फूट चटई क्षेत्राचे वाटप केले गेले . या चटई क्षेत्राचे पहिल्या माळ्यासाठी ३०६६ रुपये तर अन्य तळमजला साठी प्रति चौरस फूट २ हजार रुपये आकारणी करून पैसे वसूल होणे अपेक्षित होते.मात्र प्रत्यक्षात प्रति चौरस फूट केवळ सहाशे रुपये वसूल करण्यात आले.
हेही वाचा…यांना उमेदवार मिळेना, मग लढणार कसे? – सुषमा अंधारे
याबाबत मूल्यांकन करण्याचे वास्तूकला आर्किटेक्ट शरद चालिकवार यांनी १० जुलै २०१० ला सांगण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या मूल्यांकन माहिती नुसार पहिल्या मजल्यावरील व्यावसायिक मूल्य ३ हजार ६६ रुपये प्रति चौरस फूट तर बांधकामाची रक्कम वगळता चटई क्षेत्र दर २ हजार प्रति चौरस फूट असल्याचे प्रथम संदर्भ अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार ३० जून २००९ ची उपासभती सभा किंवा २१ ऑगस्ट २००९ संचालक मंडळ सभा किंवा ११ सप्टेंबर २००९ संचालक मंडळ सभा या सर्व सभा किंवा त्या पैकी एखाद्या किंवा दोन सभेत झाला आहे.
विशेष म्हणजे ६०० रुपये प्रति चौरस फूट हा दर निश्चित केल्याचा ठराव जेव्हा समिती समोर आला सदर ठरावांना कोणताही विरोध न दर्शविता सदरचे ठराव सर्वानुमते मंजूर केलेले असून सचिव या नात्याने स्वतःच्या पदाचा दुरूपयोग करून, सर्वांनी आपसात संगनमत करून ठराव मंजूर केला. त्यामुळे शासनाचा तब्बल ६२ कोटी ७ लाख ४८ हजार ३२४ रुपयांचा महसूल बुडवल्याचा ठपका ठेवत सभापती संचालक आणि एपीएमसी सचिव यांनी संगनमताने २३ संचालक सभापती आणि एका सचिवा विरोधात शासनाची फसवणूक , विश्वासघात, सरकारी व्यक्ती असून शासनाची फसवणूक, संगनमत करणे अशा गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.