लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई : सिडको महामंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर २६ हजार सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनेसाठी जाहीर केलेल्या सोडत प्रक्रियेसाठी पहिल्याच दिवशी १२ हजार ४०० इच्छुकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी केल्याने या सोडत प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत या योजनेसाठी नागरीक अर्ज नोंदणी करु शकतील. सिडकोने संकेतस्थळावर या योजनेची माहिती दिली असली तरी घरांच्या किमती अद्याप जाहीर केल्या नाहीत. तसेच विनापरताव्याच्या २३६ रुपये भरुन इच्छुक नागरीक त्यांचे अर्ज नोंदणी करु शकतील.

सिडकोचे ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेमध्ये वाशी, खारघर, खांदेश्वर आणि मानसरोवर या रेल्वेस्थानकाजवळील सदनिकांसह तळोजातील पनवेल मुंब्रा महामार्गालगतच्या सदनिकांचा समावेश आहे. या योजनेत लाखो नागरीक आपले नशीब आजमावतील असा अंदाज आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) च्या सदनिकांचा या योजनेमध्ये समावेश असून सिडकोच्या https:\.cidcohomes.com संकेतस्थळावर नागरिक अर्ज नोंदवू शकतील.

आणखी वाचा-नवी मुंबई : राज्यशासनाकडून पथकर माफी, मनसेचा जल्लोष

सिडको मंडळ नवी मुंबईच्या विविध नोड्समध्ये ही ६७ हजार सदनिका बांधत आहेत. यापैकी २६ हजार सदनिका (घर) सोडतीच्या पहिल्या टप्यात उपलब्ध आहेत. या योजनेतील प्रकल्पांचा विकास सिडकोच्या परिवहनकेंद्रित विकास तथा ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट या संकल्पनेवर केंद्रित असून, या योजनेत साकारली जाणारी सर्व घरे ही संबंधित नोड्समधील रेल्वे स्थानके, बस स्थानके व मेंट्रो स्थानकांच्या जवळच बांधण्यात आली आहेत. या शिवाय अतिशय अत्याधुनिक बांधकाम तंत्राचा वापर करून विकसित केलेल्या या योजनतील गृहसंकुले सर्व प्रकारच्या पायाभूत व सामाजिक सोयी-सुविधांनी युक्त असल्याचा दावा सिडकोने केला आहे.

आणखी वाचा-पनवेल : कळंबोलीत चॉकलेटचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार

सोडतीची वैशिष्ट्ये

अर्जदारांना या सोडतीसाठी ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांसाठी असून, प्रधान मंत्री आवास योजनेच्या अनुदानाचा लाभही घेता येईल.

या सोडतीशी संबंधित सर्वप्रकारच्या अर्जप्रक्रिया या सोप्या सुलभ ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.

योजनेविषयी सर्वप्रकारची माहिती सिडकोच्या https:\.cidcohomes.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्जदारांना याजनेशी संबंधित सर्वप्रकारची माहितीसाठी सिडकोच्या वरील संकेतस्थळावरील योजना पुस्तिकेत मिळणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Applications of 12400 aspirants in 24 hours for cidcos mahagrihmanirman yojana mrj