पनवेल: सिडको महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे बुधवारी सायंकाळी गणेश देशमुख यांनी स्विकारली. गणेश देशमुख यांनी यापूर्वी नांदेड व पनवेल महापालिकेचे आयुक्त पदी काम केले असून देशमुख यांच्याच कारकिर्दीत पनवेलचे अनेक विकास प्रकल्पांना गती मिळाली. पनवेल महापालिकेचा अनेक वर्षांचा रखडलेला जीएसटी अनुदानचा प्रश्न देशमुख यांनी मार्गी लावल्यामुळे कोट्यावधी रुपयांचे अनुदान पालिकेच्या तिजोरीत जमा झाले. त्यामुळे सध्या पनवेल महापालिकेच्या तिजोरीत १२०० कोटी रुपये जमा झाले आहेत. सिडको महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांची नवी मुंबई आयुक्त पदावर बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : करंजाडेवासियांच्या पाणी प्रश्नावरुन राजकारण तापले

शिंदे यांच्या पदावर गणेश देशमुख यांची वर्णी राज्य सरकारने लावली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबूकमधील देशमुख हे असल्याने त्यांची सिडकोत वर्णी लागल्याचे बोलले जात आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्यासमोर पुढील आठ महिन्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा सूरु करण्याचे आव्हान असल्याने. सिंघल यांना झपाट्याने काम करणा-या सहका-यांची आवश्यकता असल्याने देशमुख यांना खास सचिवालयात पाठपुरावा करुन मागून घेतल्याचे बोलले जात आहे. देशमुख यांनी बुधवारी पदभार स्विकारताच काही मिनिटात पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त वैभव विधाते, कैलास गावडे, मारुती गायकवाड व इतर अधिका-यांनी देशमुख यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appointment of ganesh deshmukh as joint managing director of cidco board css
Show comments