उरण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी राहुल इंगळे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे.
हेही वाचा- उरण तालुक्यात रस्तोरस्ती कचराभूमी; प्रवाशांना दुर्गंधीतून काढावा लागतो मार्ग
अनेक समस्यांवर काढावा लागणार तोडगा
उरण नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधीची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे शहरावर प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे सर्व कारभार या प्रशासनाकडून चालविला जात आहे. मात्र, उरण नगरपरिषदेच्या नव्याने नियुक्त झालेल्या उरणच्या मुख्याधिकारी यांच्यासमोर अनेक समस्या असून उरणमधील वाहतूक कोंडी, वाहनतळ, उरणच्या वाहतूक कोंडीवर उपाय असलेला बाह्यवळण रस्ता, कचराभूमीचा भूखंड, शहरातील प्रस्तावित असलेले नगरपरिषदेचे कार्यालय, बहुद्देशीय नाट्यगृह, फुल बाजार आदींची सुरू असलेली कामे, शहरातील फेरीवाल्यांची वाढती संख्या त्यामुळे नागरिकांना होणार त्रास आदी समस्यांचा सामना करीत काम करावे लागणार आहे.