नवी मुंबई : नवी मुंबई लगत असणाऱ्या आद्योगिक वसाहतीत असणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्यासाठी तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत आज (गुरुवारी) मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई मनपा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण  संयुक्तपणे हे काम करणार आहेत.

नवी मुंबई  शहरालगत ठाणे बेलापूर ही आशियातील सर्वात मोठी आद्योगिक वसाहत आहे. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वसली आहे.ही झोपडपट्टी दिघा ने शिरणवे- नेरुळ पर्यंत पसरली आहे. अंदाजे ३८ हजार झोपड्या मध्ये लाखो लोक राहत असून त्याठिकाणी मनपाचे प्रभाग ही आहेत. याच झोपडपट्टीचे अनेक वर्षांपासून घोंगडे भिजत पडले होते. गुरुवारी मंत्रालयात नवी मुंबईतील झोपडपट्टी बाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या समवेत बैठक पार पडली.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Dharavi Redevelopment Dharavi Adani Small and Micro Enterprises
धारावीच्या पुनर्विकासाचे मृगजळ
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा

हेही वाचा >>> नवी मुंबईत अतिक्रमणांचे इमले, शहरात ७ हजारांपेक्षा अधिक बेकायदा बांधकामे?

यावेळी  शिवसेना (शिंदे गट)  उपनेते विजय नाहटा , शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले , एमआयडीसी आणि , सिडकोचे अधिकारी , तसेच नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते. याबैठकीत झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी झोपडपट्टी पुनर्वसन  योजना लागू करण्याविषयी तत्वतः मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हेही वाचा >>> एपीएमसीत टोमॅटोच्या दरात प्रतिकिलो १२-१४ रुपयांनी घसरण

झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याविषयी तत्वतः मंजूर केल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे आद्योगिक वसाहत अंतर्गत दिघा ते नेरुळ  शिवाजीनगर पर्यंत असणाऱ्या झोपडपट्टी धारकांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. बायोमेट्रिक सर्वेक्षण झाल्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची   अंमलबजावणी केली जाणार आहे.अशी माहिती शिवसेना उपनेते विजय नाहटा आणि जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी दिली. राजेश नार्वेकर (आयुक्त नवी मुंबई मनपा) झोपडपट्टी पुनर्वसन साठी  बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचे आदेश जारी केले आहेत. ही प्रक्रिया झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि नवी मुंबई मनपा संयुक्तपणे करणार आहे.