नवी मुंबई : नवी मुंबई लगत असणाऱ्या आद्योगिक वसाहतीत असणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्यासाठी तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत आज (गुरुवारी) मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई मनपा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण संयुक्तपणे हे काम करणार आहेत.
नवी मुंबई शहरालगत ठाणे बेलापूर ही आशियातील सर्वात मोठी आद्योगिक वसाहत आहे. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वसली आहे.ही झोपडपट्टी दिघा ने शिरणवे- नेरुळ पर्यंत पसरली आहे. अंदाजे ३८ हजार झोपड्या मध्ये लाखो लोक राहत असून त्याठिकाणी मनपाचे प्रभाग ही आहेत. याच झोपडपट्टीचे अनेक वर्षांपासून घोंगडे भिजत पडले होते. गुरुवारी मंत्रालयात नवी मुंबईतील झोपडपट्टी बाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या समवेत बैठक पार पडली.
हेही वाचा >>> नवी मुंबईत अतिक्रमणांचे इमले, शहरात ७ हजारांपेक्षा अधिक बेकायदा बांधकामे?
यावेळी शिवसेना (शिंदे गट) उपनेते विजय नाहटा , शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले , एमआयडीसी आणि , सिडकोचे अधिकारी , तसेच नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते. याबैठकीत झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याविषयी तत्वतः मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा >>> एपीएमसीत टोमॅटोच्या दरात प्रतिकिलो १२-१४ रुपयांनी घसरण
झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याविषयी तत्वतः मंजूर केल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे आद्योगिक वसाहत अंतर्गत दिघा ते नेरुळ शिवाजीनगर पर्यंत असणाऱ्या झोपडपट्टी धारकांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. बायोमेट्रिक सर्वेक्षण झाल्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.अशी माहिती शिवसेना उपनेते विजय नाहटा आणि जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी दिली. राजेश नार्वेकर (आयुक्त नवी मुंबई मनपा) झोपडपट्टी पुनर्वसन साठी बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचे आदेश जारी केले आहेत. ही प्रक्रिया झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि नवी मुंबई मनपा संयुक्तपणे करणार आहे.