उरण: उरण येथील खोपटे गावालगतच्या खाडीकिनारी गुरुवारी मृत मासे आढळून आले आहेत. मात्र या माशाच्या मृत्यू चे कारण स्पष्ट झाले नाही. अरबी समुद्राला लागून असलेल्या या खाडीत ही मच्छिमार मासेमारी करतात त्यामुळे मृत मासळी बद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई: हिवाळी अधिवेशनानंतरच एपीएमसी संचालक सुनावणी, संचालकांना दिलासा
शुक्रवारी भरतीच्या वेळेस खोपटा खाडीतील मासे मृतावस्थेत आढळले आहेत. यामध्ये खरबी, चिवणी, बोईट, सुरमई, तांब, काटी, वडा आदी प्रकारचे मासे आढळले आहेत. उरण तालुक्यात असलेल्या औद्योगिक क्षेत्रातून रसायनयुक्त पाणी व रसायने सोडल्याने खाडीतील मासे मेल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे स्थानिक मासेमारी वर परिणाम होत आहे. तसेच पर्यावरणावरही परिणाम होऊ लागला आहे.