वाशीतील कृषी उत्पन्न बाजार आवारातील कांदा बटाटा बाजारातील कामगारांकडून मनमानी कारभार सुरू आहे. याबाबत ग्रोसरी बोर्डकडे तक्रारी करून देखील कोणतीच कारवाई न करता उलट व्यापाऱ्यांनाच दमदाटी केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ग्रोसरी बोर्डाच्या या अनागोंदी कारभारामुळे येथील व्यापारी मेटाकुटीला आले असून व्यापाऱ्यांवर आस्थापने बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ग्रोसरी बोर्ड बरखास्त करावे अशी मागणी येथील व्यापाऱ्यांनी कामगार मंत्र्यांकडे केली आहे.

हेही वाचा- ‘आरोग्य व शिक्षणासाठी शासकीय खर्च होणे गरजेचे’; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत

article about sahyadri sankalp society information
सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचा ‘संकल्प’
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Success Story An inspiring journey from selling balloons
Success Story: रस्त्यांवर फुगे विकण्यापासून ते करोडोंची कंपनी उभी करण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
Mogra Udanchan Center, court, mumbai,
मोगरा उदंचन केंद्राचे काम मार्गी लागण्याची शक्यता, न्यायालयीन सुनावणीमुळे दोन वर्षे रखडलेला प्रकल्प वर्षाअखेरीस सुरू होण्याची शक्यता
construction houses mangroves, state government,
खारफुटीवर घरे बांधल्याच्या तक्रारीच्या तपासणीचे राज्य सरकारला आदेश
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
mhada redevelopment project house cheaper
म्हाडाची घरे आता स्वस्त; वरळी, ताडदेवमधील घरांच्या किमतीत कपात
Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge : खरगे कुटुंबाच्या संस्थेला चुकीच्या पद्धतीने जमीन हस्तांतर केल्याचा भाजपाचा आरोप; सिद्धरामय्यांनंतर मल्लिकार्जुन खरगेंना घेरण्याचा प्रयत्न?

महाराष्ट्र शासनाने ज्या उद्देशाने महाराष्ट्र माथाडी हमाल आणि श्रमजिवि कामगारांचे नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम १९६९ च्या कलम ६ (१) अन्वये किराणा बाजार व दुकाने मंडळ (ग्रोसरी बोर्ड) ची स्थापना केली आहे. त्या उद्देशला हरताळ फासून फक्त कामगारांच्या मजुरीवरील लेव्हीवर पोट भरण्याचे काम कलेक्शन सेंटर म्हणून ग्रोसरी बोर्डाकडून होत आहे. प्रत्येक शेतमालाची मजुरी नगावर, वजनावर असून शेतमालाचा आवकच्या तुलनेत मजुरी संकलित होत नाही.

हेही वाचा- भाताचे कोठार म्हणून ओळख असेलला उरण तालुका भूमिहीन होणार; एमआयडीसीसाठी उरणमधील तीन गावांचे संपादन

कांदा, बटाटा मार्केट मधील ग्रोसरी बोर्डाचे कार्यालय बंद करण्यात येऊन वाराई संकलन करण्याचे कामकाज वारणार टोळी करीत आहे. या ठिकाणी कामगारांकडून समाधानकारक काम होत नसल्याने व मजुरीतील भिन्नता, कामगारांची अरेरावी, शिवीगाळ दमदाटी तसेच निर्धारीत मजूरीपेक्षा जास्त मजूरी खरेदीदार (ग्राहक) यांचेकडून वसूल करणे त्यासाठी शिवीगाळ केली जाते.याबाबत तक्रार केली आता उलटपक्षी नोंदीत व्यापाऱ्यांना दमदाटी करण्याचे प्रकार.बोर्डाकडून केले जात आहे.त्यामुळे.ग्रोसरी बोर्डाच्या आडून कांदा बटाटा बाजार आवारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे .असा आरोप कांदा बटाटा व्यापारी मनोहर.तोतलानी यांनी केला असून शासनाने ग्रोसरी बोर्ड त्वरीत बरखास्त करावे अशी मागणी देखील केली आहे.