नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात में अखेर कोकणातील हापूसचा हंगाम संपताच जूनच्या सुरुवातीलाच जुन्नर हापूसच्या हंगामाला सुरुवात होते. बाजारात आता आवक वाढली असून ७ हजार ते ८ हजार पेट्या दाखल होत असून, प्रति डझन ३५० ते ७०० रुपयांनी विक्री होत आहे. जून अखेरपर्यंत जुन्नर हापूस हंगाम सुरू राहील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
बाजारात आता राज्याबाहेरील फळांची आवक सुरू झाली आहे. केशर, निलम, तोतापुरी, बलसाड, आंबे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर जुन्नरचा हापूस बाजारात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. बाजारात आवक वाढण्यास सुरुवात झाली असून, सोमवारी बाजारात ७ हजार ते ८ हजार पेट्या दाखल झाल्या आहेत.
हेही वाचा – पनवेल: वाहनचोरीची डोकेदुखी कायम; चार दिवसांत आठ वाहनांच्या चोरीची नोंद
यंदा अवकाळी पावसाने सर्व प्रकारच्या आंब्यांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. यंदा जुन्नर हापूसचे ३५ ते ४० टक्के उत्पादन आहे. बाजारात जुन्नर हापूस प्रतिडझन ३५० ते ७०० रुपयांनी विक्री होत असून, जून अखेरपर्यंत हंगाम असेल, अशी माहिती व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.