मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सोमवारी भाज्यांची नेहेमीपेक्षा आवक जास्त झाली आहे. मात्र टोमॅटोची पावसामुळे उत्पादन खराब होत असल्याने आवक घटली असून दरात ८ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. गणेशोत्सव आणि मागील आठवड्यात सलग सुट्ट्यांमुळे बाजारात आवक कमी होती. त्याच बरोबर ग्राहक ही रोडवले होते. त्यामुळे बाजरातील भाजीपाला विक्री मंदावली होती. मात्र सोमवारपासून भाजीपाला आवक वाढेल अशी अपेक्षा होती. इतर भाज्यांची आवक वाढली आहे, मात्र पावसामुळे टोमॅटो आवक घटली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या बाजारात सोलापूर, नाशिक आणि बारामती येथून टोमॅटो दाखल होत आहेत. बाजारात टोमॅटोच्या नित्याने ४० ते ५० गाडी दाखल होत असतात,परंतु मागील आठवड्यातील पावसाच्या मुसळधाराने टोमॅटो उत्पादनावर परिणाम झाला असून बाजारात २५ ते ३०गाड्या दाखल झाल्या आहेत. परिणामी दरात ८ते १५रुपयांची वाढ झाली आहे. मागील आठवड्यात १२ ते १८ रुपयांनी उपलब्ध असलेले टोमॅटो आता २५ ते २६ रुपयांवर गेले आहेत.पावसामुळे टोमॅटो खराब झाले असून बाजारात आवक कमी झाली आहे. येत्या कालावधीत टोमॅटोचे ५०%उत्पादन खराब होईल परिणामी दर आणखीन वधारतील ,असे मत व्यापारी व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा : पनवेल : शेकाप, राष्ट्रवादी पोखरुन शिंदेगट होतोय बळकट

एपीएमसी बाजारात सोमवारी भाजीपाला आवक वाढली आहे. परंतु पावसामुळे टोमॅटो आवक कमी झाली आहे.बाजारात सोमवारी २५ ते ३० गाड्या दाखल झाल्या आहेत.त्यामुळे ५% दरवाढ झाली आहे. – श्रीकांत पाटील, व्यापारी, एपीएमसी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrival of tomatoes decreased to rain increase in price in apmc market navi mumbai tmb 01
Show comments